ETV Bharat / state

Pune Crime : क्रीडा शिक्षकाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुड टच बॅड टच उपक्रमामुळे प्रकार उघड

author img

By

Published : Jan 28, 2023, 2:42 PM IST

Minor Girls Molested
अल्पवयीन मुलीचा विनयभंग

विद्येचे पवित्र कार्य करणारे शिक्षक आई वडिलांपेक्षाही मोठे असतात. परंतु आपले रक्षकच भक्षक होतात त्यावेळेस मात्र चिंता व्यक्त केली जाते. पुण्यातील एका अल्पवयीन विद्यार्थीची क्रीडा शिक्षकांने विनयभंग केल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अविनाश गोविंद चिलवेरी या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पोलिसांच्या माहितीनुसार कोंढवा पोलीस ठाण्याच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आरोपी नोकरीला होता. मागील दोन महिन्यापासून तो शाळेतील चार ते पाच विद्यार्थिनींना मोबाईलवरून मेसेज पाठवायचा त्यांच्याशी जवळीक साधून, त्यांचे चुंबन घेऊन त्यांना मिठी मारायचा. काही दिवसापूर्वी शाळेत विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी गुड टच बॅड टच उपक्रम एका स्वयंसेवी संघटनेने राबवला होता .यामध्ये मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आल्यानंतर, विनयभंग झालेल्या विद्यार्थिनींनी हा संपूर्ण प्रकार समोर आणला आहे.



पालकांमध्ये चिंतेचे वातावरण : हा प्रकार समोर येताच पोलिसांकडून शिक्षकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात कलम 354 तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर शाळेमध्ये विद्यादान करणारे शिक्षकच आपले शोषण करणारे निघाल्याने शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात महानगरपालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त गरीब कुटुंबातले विद्यार्थी शिकत असतात. त्यांच्या आई-वडिलांना कामावर जाऊन ते बिनधास्त आपल्या मुलांना शिक्षकांच्या हवाली करत असतात. परंतु अशा प्रकारे घटना घडल्याने पुण्यात मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.

महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग : दरम्यान नुकताच 26 जानेवारी रोजी असाच एक प्रकार सांगलीत येथे घडला आहे. महिला मुख्याध्यापक त्यांच्याकडील पदाचा कार्यभार आपल्याकडे का देत नाहीत या कारणावरून त्यांचा विनयभंग केला. शाळेतील कामकाज सुरू असताना मुख्याध्यापिकेच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी दोघा शिक्षकांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता खोजानवाडी जत तालूका येथे घडली.


शिवीगाळ करत दमदाटी : मला मुख्याध्यापकाचा चार्ज देण्याबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांच्याकडून पत्र आले आहे. तरी सुध्दा तुम्ही मला शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा चार्ज का देत नाही, असे म्हणून बाळू साळुंखे यांनी पिडित महिला मुख्याध्यापिकेला मारहाण केली. त्यानंतर अर्जुन महादेव माळी यांनी ही शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यावेळी मुख्याध्यापिकेने आरडाओरडा केला असता लोक जमा झाले. असे पिडित मुख्याध्यापिकेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात बाळू तुकाराम साळुंखे व अर्जुन महादेव माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Pune Crime लहान बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या विवाहित बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.