ETV Bharat / state

जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही; तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, विरोधक आक्रमक

author img

By

Published : Nov 20, 2020, 7:07 PM IST

Updated : Nov 20, 2020, 7:15 PM IST

जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही असा इशारा विरोधी पक्ष भाजपकडून महाआघाडी सरकारला देण्यात आला आहे.

Praveen Darekar
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

दौंड (पुणे) - राज्यातील वीज ग्राहक वाढीव वीज बिलाचा सामना करत असून राज्यात असलेले सरकार ग्राहक मेळावे घेऊन वाढीव वीज बिल कसे बरोबर आहे, हे जनतेला सांगणार आहे. त्यामुळे जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलताना
दौंड तालुक्यातील राहू येथे आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देऊ, अशा प्रकारचे आश्वासन राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. नंतर त्यांनी शब्द पलटवून वीज बिलात सवलत देऊ असे सांगितले. त्याचाही या सरकारला विसर पडला असून संपूर्ण वीज बिल भरण्यासाठी सरकार अट्टाहास करत आहे. त्यामुळे एक प्रकारे आर्थिक संकटात असलेल्या वीजग्राहक व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे महापाप या सरकारकडून केले जात असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसची फरफट -
तसेच या सरकारमध्ये काँग्रेसची फरफट सुरू असून काँग्रेसच्या आमदारांना दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. काँग्रेस देखील सत्तेसाठी लाचार बनली असल्यामुळे ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. या सरकारमधील मंत्र्यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नसून सत्ता, स्वार्थ, बगलबच्चासाठी बदल्या व भ्रष्टाचारासाठी हे सरकार पाठबळ देत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. याप्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, अविनाश मोटे, तानाजी थोरात, तानाजी दिवेकर, गणेश आखाडे, आदींसह विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated :Nov 20, 2020, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.