ETV Bharat / state

Pune Crime : तळेगावात मारेकऱ्यांचे तांडव, किशोर आवारेंवर आधी झाडल्या गोळ्या, मग कोयत्याचे 18 वार; खुनाच्या थराराने नागरिक हादरले

author img

By

Published : May 13, 2023, 8:55 AM IST

Updated : May 13, 2023, 9:59 AM IST

Pune Crime
संपादित छायाचित्र

पिंपरी चिंचवड परिसरातील तळेगावात किशोर आवारेंची हल्लेखोरांनी कोयत्यांचे तब्बल 18 वार करुन खून केला. नगर परिषदेच्या कार्यालयातून बाहेर निघल्यानंतर त्यांच्यावर अगोदर गोळीबार करण्यात आला, त्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पुणे : जनसेवा विकास समितीच्या संस्थापकावर अज्ञात मारेकऱ्यांनी कोयत्याचे 18 वार करुन खून केल्याने खळबळ उडाली. मारेकऱ्यांनी भरदिवसा नगर परिषद आवारात केलेल्या या खुनाच्या घटनेने नागरिक चांगलेच हादरले आहेत. विशेष म्हणजे खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी रोडवरुन जाणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी घेऊन पळ काढला. किशोर आवारे असे त्या खून झालेल्या जनसेवा विकास समितीच्या अध्यक्षांचे नाव आहे. किशोर आवारे हे तळेगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. कार्यालयाच्या बाहेर आल्यावर त्यांच्यावर अगोदर गोळीबार केला, त्यानंतर कोयत्यांनी वार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कसा झाला किशोर आवारेंचा खून : किशोर आवारे हे शुक्रवारी दुपारी तळेगाव नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. भेट झाल्यानंतर ते बाहेर पडले. यावेळी त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या चार मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने तब्बल 18 वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किशोर आवारे यांचा खून झाल्यानंतर मावळसह पुणे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

सोशल मीडियावर खुनाचा व्हिडिओ व्हायरल : किशोर आवारे यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या खुनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किशोर आवारे यांच्यावर कोयत्याने तब्बल 18 वार करत निर्घृण खून केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर खुनानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकी चालकांना धमकावत त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत. दीड महिन्यापूर्वी शिरगावचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांचा देखील खून करण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद : किशोर आवारे यांचा खून केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांना थांबवून त्यांना बंदूक दाखवून धमकावले. बंदुकीच्या धाकावरच त्यांच्याकडील दुचाकी घेऊन आरोपी पसार झाले. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

किशोर आवारे यांनी दिला होता टोल नाका हटावचा नारा : गेल्या काही दिवसांपासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका हटावचा नारा किशोर आवारी यांनी दिला होता. सोमाटणे टोल नाका हटाव कृती समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आल्याचे दिसत होते. आंदोलनानंतर राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनी देखील टोलमुक्तीबाबत त्यांना आश्वासन दिले होते. दरम्यान, त्यांच्या हत्येनंतर हा प्रश्न मात्र जैसे थे राहणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -

1) Shot To Youth : हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने झाडली तरुणावर गोळी; तरुणाचा मृत्यू

2) Tihar Jail : कॅमेऱ्यासमोरच माफियाचा खून झाल्यानंतर प्रशासनाला आली जाग; तिहार कारागृहातील 99 अधिकाऱ्यांची उचलबांगडी

3) Suicide of 8 Students: परिक्षेत नापास झाल्यामुळे तब्बल आठ विद्यार्थ्यांची आत्महत्या

Last Updated :May 13, 2023, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.