ETV Bharat / state

Fake CBSC Certificate In Pune : पुणे जिल्ह्यातील 3 सीबीएससी शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट

author img

By

Published : Jan 7, 2023, 7:53 PM IST

Fake CBSC Certificate In Pune
सीबीएससी

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांच्या जे शासनाचे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र बनावट (Fake CBSC Certificate In Pune) असल्याचे आढळून आले आहेत. या तिन्ही शाळांची यादी (Fake CBSE School List) शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अजूनही जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी (Complaint to Education Department) शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे. (Latest news from Pune)

शासनाच्या बनावट प्रमाणपत्राबाबत बोलताना औदुंबर उकिरडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Fake CBSC Certificate In Pune) एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बीएमसीसी रोड, शिवाजीनगर, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (Fake CBSE School List) या तिन्ही सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत. (Complaint to Education Department) बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे.मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपये मध्ये सिबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचे समोर आले आहे. (Latest news from Pune)

Fake CBSC Certificate In Pune
बनावटी प्रमाणपत्र

फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार : या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.तसेच आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी,प्रशासन अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत की प्रत्येक सीबीएससी शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली ते लावल जेणे करुन ज्यांची मान्यता आहे त्यांची मान्यता समोर येईल.आणि ज्यांची मान्यता नसेल ते देखील समोर येणार असल्याचं यावेळी औदुंबर उकिरडे यांनी सांगितल आहे.

सीबीएसई पॅटर्नच्या पालिकेच्या शाळा : सीबीएसई अभ्यासक्रमाच्या २४ शाळा मुंबईत सुरू होत आहेत. या शाळांमधून दर्जेदार आणि मोफत शिक्षण दिले जाणार आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पवई येथील तुंगा व्हिलेजमधील सीबीएसई शाळेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दिलीप लांडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, राहुल कनाल, झकारिया, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उप शिक्षणाधिकारी संगीता तेरे यावेळी उपस्थित होत्या.

स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्ड : पवईमधील तुंगा व्हिलेज येथील ३६० विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आलेले १९२८ अर्ज पालिकेकडे आले होते. ही बाब विचारात घेत, पुढील काळात सुद्धा दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका कटिबद्ध आहे. भविष्यात मुंबई महापालिका शाळांमध्ये आयबीच्या शाळा सुद्धा सुरू केल्या जातील. या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाईल. तसेच प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु केली जाईल अशी ग्वाही मंत्री ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच २४ वस्तूचे विनामूल्य वाटप, खेळांमध्ये फिफासोबतचा करार आदी सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका सक्षम असल्याचे ते म्हणाले. कोरोना अद्याप गेलेला नाही. नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची सूचनाही मंत्री ठाकरे यांनी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.