ETV Bharat / state

Dr. Raghunath Mashelkar Message to Youth : अथक परिक्षम, महत्त्वाकांक्षा ठेवून स्वत:चा मार्ग निर्माण करा - डॉ. रघुनाथ माशेलकर

author img

By

Published : Jan 12, 2022, 7:11 AM IST

Dr. Raghunath Mashelkar part 2
डॉ. रघुनाथ माशेलकर विशेष मुलाखत

तुमची शेवटची चुकच तुमचा उत्तम शिक्षक आहे. म्हणून तरुणांनी मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे, अथक परिश्रम परिश्रम केले पाहिजे, अपयशातून शिकलं पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे. ( Dr. Raghunath Mashelkar with ETV Bharat ) या मुलाखतीत त्यांनी त्यांचा जीवनप्रवासाबद्दल, त्यांचं मराठी शाळांबाबतचं मत, भारतीय विद्यार्थी विज्ञानशाखेकडे वसे वळतील या विषयांसोबतच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मुलाखतीचा हा दुसरा भाग.

हैदराबाद - तुमची शेवटची चुकच तुमचा उत्तम शिक्षक आहे. म्हणून तरुणांनी मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे, अथक परिश्रम परिश्रम केले पाहिजे, अपयशातून शिकलं पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे. ( Dr. Raghunath Mashelkar with ETV Bharat ) या मुलाखतीत त्यांनी त्यांचा जीवनप्रवासाबद्दल, त्यांचं मराठी शाळांबाबतचं मत, भारतीय विद्यार्थी विज्ञानशाखेकडे वसे वळतील या विषयांसोबतच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मुलाखतीचा हा दुसरा भाग.

ईटीव्ही भारतने ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची घेतलेली मुलाखत

प्रश्न - सर, नुकताच आता 1 जानेवारीला तुमचा वाढदिवस होता. तुम्ही 79 वर्षांचे झालात. पुढच्या वर्षी तुम्ही 80 वर्षांचे व्हाल. पण तुमची ऊर्जा 18 वर्षांच्या मुलासारखी आहे. या वयातही तुम्ही इतके energetic, active कसे राहतात?

उत्तर - जसं इंग्रजीत म्हटलंय, 'It is mandatory that you become old, but it is not mandatory that you feel old' याचा अर्थ तुमचं वय वाढत जाणार पण आपण वृद्ध आहोत ही भावना मनात ठेवणं हे तुमच्यावर अवलंबून असतं. Biological Age महत्त्वांचं नाहीये. तर Mental Age महत्त्वाचं आहे. मी माझ्या आयुष्यात असं पाहिलंय की जर आपण नाविन्याचा शोध घेत गेलो आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन करायचं, असं ठरवत गेलो आणि या नाविन्याच्या शोधातून जसजसे पुढे जात असतो, शिकत असतो त्यामुळे आपण तरुण राहतो. उदा. दररोज सकाळी मी पाच वाजेच्या सुमारास उठतो. त्यानंतर जवळपास माझं दोन तास वाचन असतं. त्याच्यानंतर मी चालायला लागतो. (Morning Walk) हे वाचन नवनवीन क्षेत्रात नवनवीन काय होतंय? या विषयावर असतं. तसंच Morning Walk करताना माझ्याकडे मोबाईल असतो, आयपॉड असतो त्याच्यामध्ये मी लेक्चर्स ऐकतो, याप्रकारे दररोज मी माझ्या ज्ञानात मी भर घालत असतो. माझ्या आयुष्यातील ही शेवटची इनिंग आहे. ती सर्वार्थाने चांगली असली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत असतो.

2. सर, तुम्ही नेहमी म्हणतात की, तुम्ही जे आहात त्यात तुमच्या आईनं मोठी भूमिका बजावली आहे. तुमच्या आईंबद्दल सांगाल.

उत्तर - हो. खरंय. मी मातृभक्त म्हणून ओळखलो जातो. मी जे आहे ते तिच्यामुळे आहे, तिने दिलेल्या मुल्यांमुळे आहे. माझा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपणीच वडील गेले. मनपाच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. अशा परिस्थितीत एका अशिक्षित स्त्रीला शिक्षणाचं कळालेलं महत्त्व आणि तिने ते पुढे नेलं हे फार महत्त्वाचं आहे. उदा. गणितात नेहमी 100 गुण मिळायचे. तर कधीकधी 97 गुण मिळायचे. मी आनंदी असायचो. मात्र, ती मला बसून विचारायची की हे तीन गुण कुठे गेले? यासोबतच ती एकदा पार्थना समाजमध्ये नोकरीच्या शोधात गेली होती. रांगेत उभी राहिल्यानंतर तिचा नंबर आला. तिथे तिला तिसरी पास असणं अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं. ती तिथे खोटं बोलू शकली असती. कारण तिसरी पास असल्याचं प्रमाणपत्र तेव्हा मिळत नव्हतं. ती नाही म्हटल्यामुळे तिला नोकरी मिळाली नाही. परत येत असताना ती म्हणाली माझा अपमान शिक्षण नसल्यामुळे झाला. मी माझ्या मुलाला मला कल्पना नाही किती, इतकं मोठं शिकवणार. मी Ph.D. केल्यानंतर Post Doct साठी तिने प्रेरित केलं. तिचं निधन 17 नोव्हेंबर 2006 मध्ये झालं. त्याच्या तीन महिन्याआधी मला 25 मानद डॉक्टरेट मिळाल्या होत्या. त्यावेळी ती म्हणाली होती, आता माझं समाधान झालं. ती गेल्यानंतरही अंजनी माशेलकर फाऊंडेशन नावाने सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून काम केलं जात आहे. गेल्या 11 वर्षांपासून हे काम सुरू आहे. ( Anjani Mashelkar Inclusive Innovation Award )

3. सर, तुम्ही सरकारी शाळेत शिकलात. तुमचं शालेय शिक्षण पूर्ण मराठी भाषेत झालं. आणि तुम्ही अनेकदा म्हणता की त्यामुळे काही फरक पडला नाही. मराठी शाळेत शिक्षण घेऊन तुम्ही जागतिक स्तरावर पोहोचलात. मराठी शाळांबाबत तुमचे मत काय?

उत्तर - मला असं वाटतं की, मातृभाषेत शिकणं फार महत्त्वाचंय असं मला वाटतं. आणि मी मनपाच्या शाळेत, मराठी शाळेत शिकलो त्यामुळे काही फरक पडला नाही, हे तुम्ही पाहिलं असेल. आपली आकलन शक्ती मातृभाषेत जास्त असते, त्याचा मला प्रचंड फायदा झाला. त्यात तुमचे शिक्षक फार महत्त्वाचे असतात. लहानपणी मिळालेले शिक्षकांसारखे शिक्षक मला नंतर नाही भेटले. शिक्षणाचा अर्थ काय? ज्ञानसंवर्धानाबरोबरच मूल्यसंवर्धन हा आहे. त्यातील मूल्यसंवर्धन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गुगलवरुन तुम्हाला प्रंचड ज्ञान मिळेल. पण मूल्य जी आहेत ती गुगल देऊ शकत नाही. त्याचा पाया मजबूत झाला तर तुम्ही त्यानंतर चूक करणार नाही.

4. सर, तुम्ही अलीकडे असेही म्हटले आहे की २०२० हे केवळ महामारीचे वर्ष नव्हते तर ते भारतीय विज्ञानाचे वर्ष होते. सर, तुम्ही विज्ञान शाखेतच करिअर करायचं कसं ठरवलं? त्यात जास्तीत जास्त विद्यार्थी विज्ञानाकडे कसे वळतील याबद्दल सांगाल.

उत्तर - मी विज्ञान शाखेत येण्याचं श्रेय मी माझ्या भावे सरांना देईन. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाण्यासाठी मला 21 रुपयांची आवश्यकता होती. आईला ते जमा करायला 21 दिवस लागलेत. यामुळे चांगल्या शाळा माझ्यासाठी बंद झाल्या. आणि मला एका युनियन शाळेत जावे लागले. ही शाळा जरी गरीब असली तरी येथील शिक्षक श्रीमंत होते. त्यातील एक भावे सर. त्यांनी विज्ञान शिकवलं. पाहून शिकणं हे फार महत्त्वाचं असतं. पाठ करायचं यापेक्षा ते पाहून शिकवणं पसंत करायचं. उदा. साबण बनविण्याची प्रक्रिया. ती प्रक्रिया मी पाहिली. यानंतर अंबरनाथला विम्कोची फॅक्टरी होती. तिकडे काड्यांची पेटी (Matchbox) कशी बनवितात, हे त्यांनी दाखविलं. त्यानंतर एके दिवशी त्यांनी उन्हात आम्हाला घेऊन गेले. एका कागदावर बहिर्वक्र भिंग फिरवून (Focal Length) तो कागद जळला. यानंतर ते मला म्हणाले की, जर तु फोकस करुन सर्व शक्ती एकत्र आणली, तर तु काहीही करू शकतोस. यानंतर मला स्फुर्ती आली. मी वैज्ञानिक होण्याचं तेव्हा ठरवलं.

दुसरी गोष्ट मुलांना विज्ञानाकडे वळवणं फार महत्त्वाचं आहे. कोरोना पँडेमिकमुळे याला तोंड देण्यासंबंधीची यंत्रणा आपल्याकडे नव्हती. आपल्या या आजाराविरोधात लढण्याची औषध नव्हती. पण भारतीय शास्त्रज्ञांनी दाखवलं की 2020मध्ये यावर मात करुन दाखविली. फार कमी देश आहेत ज्यांनी स्वत: लस निर्माण केली. सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त (higest quality) औषधी उपलब्ध करुन दिल्यात. रोगाचं निदान स्वस्तात केलं. वेळ कमी झाला. देश विज्ञानामुळे वाचला. भारताचं भविष्य विज्ञानामुळे घडणार आहे. आपण संत ज्ञानेश्वरांविषयी बोलतो. आता आपण ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वराकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं.

हेही वाचा - Raghunath Mashelkar On Education Policy : योग्य शिक्षण, शिक्षणाचा योग्य मार्ग हे फार महत्त्वाचे -डॉ. रघुनाथ माशेलकर

5. सर, तुम्ही डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या खूप जवळचे होते. आपण सगळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. मात्र, तुम्ही पाहिलेल्या त्यांच्या human qualities (मानवी गुणांबद्दल) बद्दल सांगाल.

उत्तर - आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. मात्र, यासोबत तो माणूस काय आहे, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. माणूस म्हणून आणि त्यांची माणूसकी याचा मला स्वत: अनुभव आलेला आहे. उदा. त्यांचा नम्रपणा. (Humility of Dr. Kalam) मला आठवतं, 1993 मध्ये जेव्हा ते DRDOचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांच्या 55 प्रयोगशाळा होत्या. त्याची बैठक ते पुण्यात घेणार होते. त्यावेळी मला सांगण्यात आलं की, ते उत्तेजित होतील, अशा प्रकारचे भाषण कर. मी त्यांना एक विषय सांगितला आणि ते हो म्हणाले. त्यावेळी मी त्यांचा उल्लेख Mr. Technology of India असा केला. त्यानंतर पेटंटवर मी बराच जोर देत होतो. पेटंट साक्षरतेबद्दल सांगितलं. हे किती महत्त्वाचं आहे हे सागितलं. त्यानंतर लंच ब्रेकमध्ये ते जवळ आले. यावेळी ते म्हणाले, तु नेहमीप्रमाणे माझ्याबद्दल चांगला बोललास. माझा उल्लेख Mr. Technology of India असा केलास. मात्र, मी Patent Illiterate of India आहे. मला सांग आम्हाला DRDO मध्ये त्याचं काय महत्त्व आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, सर तुम्ही Missile Patent नाही करु शकत. मात्र, सेंसर बनवलं, तर त्यासाठी तुम्ही करु शकाल. यानंतर त्यांनी कुणाला बोलावून सांगितलं की, इकडे ये आणि माशेलकर म्हणतात ते कर. म्हणजे Mr. Technology of India जे पुढे भारताचे राष्ट्रपती झाले ते स्वत:ला Patent Illiterate of India असं म्हणतात, हा त्यांचा नम्रपणा आहे, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

6. या संवादाचा शेवटाकडे जाताना विचारतो, भारतासाठी युवाशक्ती हीच खरी शक्ती (Real powar) असल्याचे तुम्ही अनेकदा सांगितलंय. भारतातील तरुणांसाठी तुमचे प्रेरणादायी मंत्र, तुमचा संदेश काय आहे?

उत्तर - माझा 5 माशेलकर मंत्रा फार प्रसिद्ध झालाय. पहिला भाग म्हणजे, महत्त्वाकांक्षा. ती मोठी ठेवली पाहिजे. एव्हरेस्टवर जायचं ठरवलं तर कांचनगंगेपर्यंत पोहोचाल. मात्र कांचनगंगेपर्यंत जायचं ठरवलं तर हनुमान टेकडी पर्यंत पोहोचाल. ज्यावेळी मी NLC चा डायरेक्टर झालो तेव्हा मी ठरवलं की, National Chemical Laboratory Should be International. आणि आपण अपेक्षा उंच ठेवल्या तर हे होऊ शकतं. दुसरा मंत्र म्हणजे अथक परिश्रम. आजकालच्या तरुणांना Instant Success हवंय. आपण म्हटल्याप्रमाणे मी आता 79 वर्षांचा आहे. मात्र, आजचा माझा हा दुसरा कार्यक्रम आहे. आज आणखी चार कार्यक्रम आहे. शेवटचा रात्री साडेनऊला संपणार आहे. असंच माझं काम सलग चालत असतं. हे शेवटपर्यंत चाललं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, Hardwork करा, फक्त ते शांत राहून करा. तुमचं यश जे आहे त्याला आवाज करु द्या. तुम्ही आधीच आवाज करू नका. तिसरा भाग म्हणजे, Purpose, Passion, and Perseverance हे फार महत्त्वाचं आहे. अपयशातून शिकलं पाहिजे. FAIL म्हणजे, First Attempt in Learning. तुमचा उत्तम शिक्षक म्हणजे तुमची शेवटची चूक. Your best teacher is your last mistake आणि त्यातूनच शिकलं पाहिजे. चौथा भाग म्हणजे, you people are knocking on the doors. ते उघडत नाही तर तुम्ही स्वत:चं दार निर्माण करा. स्वत:चा मार्ग निर्माण करा. आणि पाचवा भाग म्हणजे Best is yet to come.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.