Raghunath Mashelkar On Education Policy : योग्य शिक्षण, शिक्षणाचा योग्य मार्ग हे फार महत्त्वाचे -डॉ. रघुनाथ माशेलकर

author img

By

Published : Jan 7, 2022, 6:07 AM IST

Updated : Jan 7, 2022, 3:29 PM IST

Dr. Raghunath Mashelkar Special Interview with ETV Bharat

नवीन शिक्षण धोरण 2020चा अभ्यास करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशी, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थांना होणारा फायदा या विषयावर 'ईटीव्ही भारत'ने डॉ. माशेलकर यांची विशेष मुलाखत घेतली. ( Dr. Raghunath Mashelkar Special Interview with ETV Bharat ) मुलाखतीचा हा पहिला भाग.

हैदराबाद - आपण नेहमी Right to Education बाबत बोलत असतो. पण त्याच्याही पुढे जाऊन Right Education, Right way of Education हे फार महत्त्वाचे आहे, असे मत भारताला हळदीचं पेटंट मिळवून देणारे, सीएसआयआर या संस्थेचे माजी महासंचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले आहे. नवीन शिक्षण धोरण 2020चा अभ्यास करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशी, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थांना होणारा फायदा या विषयावर 'ईटीव्ही भारत'ने डॉ. माशेलकर यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या काळातील आणि आताच्या तरुणाईमधील फरक, तसेच तरुणाईने सुरु केलेल्या स्टार्टअप, त्याचे भविष्य तसेच पेटंट साक्षरता यांसारख्या मुद्यांवर चर्चा केली. मुलाखतीचा हा पहिला भाग. ( Dr. Raghunath Mashelkar Special Interview with ETV Bharat )

ईटीव्ही भारतने ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची घेतलेली मुलाखत

प्रश्न - नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे तुम्ही अध्यक्ष होता. तुम्ही तिथे केलेल्या शिफारशींबद्दल आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होणार, याबद्दल सांगाल.

उत्तर - हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण शिक्षण म्हणजे भविष्य हे मी नेहमी म्हणत असतो. आणि हे भविष्य घडविण्याची ताकद असणारं शिक्षण आपल्याला महत्त्वाचं आहे. आपण नेहमी Right to Education बाबत बोलत असतो. पण त्याच्याही पुढे जाऊन Right Education, Right way of Education हे फार महत्त्वाचंय. कोरोना आल्यानंतर Right to Educationमध्ये आपण पाहिलं की, digital deprecation जाणवलं. आपल्याकडे गरीबी इतकी आहे की, एका घरामध्ये एकच फोन आणि पाच मुलं असल्यावर कसं शिकणार? किंवा काही घरांमध्ये काहीच नाही. काही घरांमध्ये कनेक्टीव्हीटीच नाही. खेड्यापाड्यातील मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं. देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्याही झाल्या. साताऱ्यामध्येही एका मुलीने आत्महत्या केली. म्हणून Right Education त्याला Digital Right Education फार महत्त्वाचंय. विद्यार्थ्याला आता Internet सुद्धा महत्त्वाचंय. आमची एक शिफारस अशी आहे, विद्यार्थ्यांचा हा अधिकार आहे. आता शिक्षण हा अधिकार नाही तर Digital Right to Education हा आहे.

यानंतर Right Education. जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाने फरक पडला आहे. आधी पैसे पाठवायला वेळ लागत असे. आता वेळ लागत नाही. याचा अर्थ काय आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच Automation मुळे नोकऱ्या जाणार आहेत. यामुळे आता भविष्याचा वेध घेणारं शिक्षण हवं आहे. तसंच शिक्षण सर्वसमावेश असलं पाहिजे. मुलींना, मुलांना त्यात फरक करता कामा नये. समाजातील गरीब मुलांनाही ते मिळालं पाहिजे, यावर आमचा प्रंचड जोर आहे.

तिसरा मुद्दा म्हणजे, Right Way of Education. आपण पाहिलं असेल, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या. हे चालतच राहणार आहे. म्हणून शिक्षण हे केवळ डिजीटल आणि फिजिकल राहणार नाही. ते फिजिटल होणार आहे. याचा अर्थ काही भाग डिजीटल करावा लागेल, तर काही भाग फिजिकल करावा लागेल. शिक्षण म्हणजे काय, Learning, Doing and Being. यातील Doing हे फार महत्त्वाचं आहे. आणि Being - Being a part of Society समाजाचा आपण एक भाग आहोत, यासाठी शाळांमधील समाजाबरोबरचे हे interaction फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला सर्वसमावेश शिक्षण म्हणजे माणसाला माणूस बनवणारं शिक्षण याच्यावर आम्ही प्रचंड जोर दिला आहे. हे स्पर्धात्मक युग आहे. महाराष्ट्र हा शिक्षणात नेहमी जगाच्या पुढे राहिला आहे. मी भारताच्याच पुढे नाही तर जगाच्या आपण कसं पुढे जाऊ, हा विचार त्यात करण्यात आला आहे.

प्रश्न - सर, भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं. तुम्ही तरुणाई आणि स्टार्ट-अप्सवर आपली मतं व्यक्त केली आहेत. तुमच्या काळातील तरुण आणि सध्याच्या तरुणांमध्ये काय फरक आहे?

उत्तर - बराच फरक आहे. आमच्यावेळी शिक्षण झालं की उत्तम नोकरी कशी मिळेल याकडे लक्ष असायचं. महत्त्वाकांक्षा कमी असायच्या. मात्र, आत्ता तसं नाहीये. माझा तरुणांशी बराचसा संपर्क असतो. त्यात माझा स्वार्थही आहे. तो म्हणजे, तरुणाईच्या सान्निध्यात असलं की, तरुणपणाची फिलिंग येते. एकदा विद्यार्थ्यांशी बोलत होतो, मला आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीचा फार अभिमान आहे. कारण माझं पूर्ण शिक्षण भारतातच झालं. पीएचडीसुद्धा मी भारतातच केली. अमेरिका आणि कॅनडामध्ये मला अनेक संधी होत्या. यामुळे मी भारतातील शिक्षणपद्धतीची स्तुतीसुमने गात असतो. तिथे बोलत असताना म्हणालो, मायक्रॉसॉप्टचे सत्या नाडेला, गुगलचे सुंदर पिचई हेदेखील भारतात शिकले. तुम्ही मोठे व्हा. सुंदर पिचई व्हा, सत्या नाडेला व्हा. यावेळी एक विद्यार्थी तिथे उभा राहिला आणि म्हणाला, सर, मी तुमच्या मताशी सहमत नाही. तुमच्या काळातील महत्त्वाकांक्षा होती की अमेरिकेला जायचं. त्यानतंरची पिढी आली की, अमेरिकेला जायचं मात्र, कुठेतरी चांगली नोकरी मिळावी. तिसरी पिढी जी आली ती म्हणते की अमेरिकेला तर जायचंच, मायक्रोसॉफ्टमगध्ये जॉब मिळवायचा पण त्याचं सीईओसुद्धा व्हायचं. मात्र, आमची पिढी ती नाही. आज आम्हाला आमच्या भारतात गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या उघडायच्या आहेत. आजच्या तरुणाईच्या या मोठ्या महत्त्वाकांक्षा आहेत, ज्या मला आवडतात.

आपण पाहिलं असेल की स्टार्टअपमध्ये काय फरक पडला ते मी सांगतो. त्यात खरंतर आपल्या सरकारचं कौतुक करायला पाहिजे. कारण त्यांनी त्यासाठी फार मेहनत घेतली आहे. तरुणाईमध्ये आपण इतरांना नोकरी देऊ शकतो हा आत्मविश्वास जागवला आहे. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार दोघांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आपण पाहिलं असेल की, ज्याला आपण Unicorns म्हणतो, एकदा त्याची Market Value ही 7 हजार कोटी इतकी झाली. हे Unicorn तयार होण्याचं प्रमाण हे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे. आज भारताकडे 75 Unicorns आहेत. ते प्रमाण आणखी वाढेल. मी त्याचं विश्लेषण केलं. हे आलं कुठून? आयआयएम, आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हे केलं का? तर नाही. हे देशातील 2 tier आणि 3 tier सारख्या शहरातील मुलांनी केले आहे.

प्रश्न - सर, पेटंट साक्षरतेबद्दल बोलतात. तुम्ही देशाला हळदीचं पेटंट मिळवून दिलंत. तर तुम्ही जे देशाला हळदीचं पेटंट मिळवून दिलंत त्याबद्दल आणि पेटंट किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगाल.

उत्तर - पेटंटबाबत आपण जरा निरक्षर होतो. एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की वायरलेस कोणी शोधून काढलं तर तो म्हणेल मार्कोली. पण नाही. ते भारतीय शास्त्रज्ञ जेसी बोस यांनी शोधून काढलं आहे. त्याने पेटंट घेतलं नाही. नंतर 1998 मी बासमतीची लढाई लढलो. 1898 ते 1998 हा 100 वर्षांचा काळ गेला. या कालावधीत आपल्याला पेटंटचं महत्त्व कळलं नाही. त्यामुळे मी NCL चा Director होतो तेव्हा सुरू केली. आणि 39 वर्षात त्या प्रयोगशाळेत अमेरिकेन एकही पेटंट मिळालं नव्हतं. यानंतर आम्ही अनेक अमेरिकन पेटंट घेतली. त्यातली तीन आम्ही 7 कोटी रुपयांना अमेरिकन कंपनीला दिली. Innovation फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण नवीन काहीतरी शोध लावतो, त्याचे मालकी हक्क तुमच्याकडे असायला पाहिजे. पेटंट तुम्हाला ते अधिकार देतो. आपण काही नवीन शोध लावले तर पब्लिश करायचो. मग बाकीची लोकं त्याच्यावर पैसे कमवायचे. मी म्हटले हे चुकीचं आहे. आपल्या संशोधनाचा फायदा आपल्याला व्हायला पाहिजे.

हळदीच्या पेटंटच्या लढाईचंही श्रेय मी आईला देईन. मी जेव्हा NCL चा Director होतो. एकदा आम्ही गच्चीवर बसलो होतो, मी माझी पत्नी आणि मुलगा अमेय बसलो होतो. यावेळी एक पक्षी पडला. त्याचा पंख तुटला होता. त्यावेळी आई धावत आली आणि तिने त्याला हळद लावली. यानंतर तो पक्षी साधारणत: दोन तासाने गेला. त्याने मान टाकली. त्यावेळी आम्ही अक्षरश: रडलो. त्यावेळी मी आईला विचारलं, माणसाला चालणारी हळद पक्षाला चालेल की नाही हा विचार तुझ्या मनात नाही का आला? तर ती म्हणाली की नाही. सजीव आहे म्हणून आपण हळद वापरू शकतो. याचदरम्यान, मी टाईम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं की, अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलंय. तेव्हा विचार आला, याबाबत आपल्या पिढ्यानपिढ्या सर्वांना माहिती आहे. अमेरिका यावर पेटंट कसं घेऊ शकतं? मग मी संध्याकाळी जाहीर केलं की याची लढाई लढणार आहे. या माध्यमातून मी अमेरिकेला दाखवून दिलं की त्यांनी एकच नाही दोन हजार चुकीची पेटंट दिली आहेत. यावेळी त्यांनी दाखवलं की, आमच्याकडे एक व्यवस्था आहे. त्याच्यावर आम्ही जातो. त्यात डाटा आहे. मात्र, मी त्यांना Traditional Knowledge Digital Library ज्यामध्ये तीन कोटी पानं आहेत. यात सर्व माहिती आम्ही दिली. यानंतर मग ते Patent Office साठी सक्तीचं करण्यात आलं की ती माहिती दिल्याशिवाय ते पेटंट देणार नाहीत. त्यामुळे आता चुकीचं पेटंट देता येणार नाहीत. याचं श्रेय मी त्या पक्ष्याला आणि माझ्या आईला देतो.

Last Updated :Jan 7, 2022, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.