ETV Bharat / state

विश्वचषक जिंकण्यासाठी देशभरात प्रार्थना; कुठे महाआरती तर कुठे होम-हवन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 4:59 PM IST

Cricket World Cup Final : विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना होत आहेत. कुठं मंदिरात पूजेचं तर कुठे मशिदीत नमाजाचं आयोजन केलं जात आहे. पुण्यातील मानाच्या कसबा गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली, तर मुंबईच्या माधवबाग मंदिरात होम-हवन करण्यात आलंय. तसंच प्रयागराजमध्येही तृतीयपंथांनी भारतीय संघाच्या विजयासाठी विशेष प्रार्थना केली.

Cricket World Cup Final
Cricket World Cup Final

विश्वचषक जिंकण्यासाठी देशभरात प्रार्थना

पुणे Cricket World Cup Final : जगभरात सध्या विश्वचषकाची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच भारतानं यावर्षी अंतिम फेरीत प्रवेश केलाय यामुळं 2011 च्या विश्वचषकानंतर भारताकडं हा विश्वचषक जिंकण्याची संधी आलीय. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं आता भारतानं हा विश्वचषक जिंकावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.

कसबा गणपतीला महाआरती : पुण्यात क्रिकेटप्रेमींनी प्रसिद्ध ग्रामदेवता कसबा गणपती मंदिरात गणरायाकडं आराधना करत महाआरती केली. या महाआरती वेळी अनेक लहान मुलं सहभागी झाले होते. भारताचं विश्वचषकाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी यावेळी देवाला साकडं घालण्यात आलंय. भारतीय टीम सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन असून गोलंदाजी आणि फलंदाजीत सुद्धा अतिशय चांगलं प्रदर्शन करत आहे. क्षेत्ररक्षणाबाबत थोडीशी चिंता रोहित शर्मानं व्यक्त केली होती. परंतु, आता याचीसुद्धा तयारी भारतीय संघाकडून करण्यात येत असल्याचं दिसतंय. त्यामुळं रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतानं हा विश्वचषक आपल्या नावे करावा यासाठी ही महाआरती करण्यात आलीय.

मुंबईतही होम हवन : मुंबईतही क्रिकेटप्रेमींच्या वतीनं माधवबाग मंदिरात भारतानं विश्वचषक जिंकावा यासाठी होम-हवन करण्यात आलं. यावेळी क्रिकेटप्रेमींना भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती. तसंच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते.

उत्तर प्रदेशात तृतीय पंथीयांकडून प्रार्थना : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये तृतीयपंथी समुदायानंही विशेष पूजा केली आणि भारतीय संघाला विश्वचषक जिंकावं म्हणून प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या हातात भारतीय संघाच्या खेळाडूंचे फोटो दिसत होते. त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रार्थना केली. याशिवाय भारतीय संघाच्या विजयासाठी भारतातील मशिदींमध्येही नमाज अदा करण्यात येत आहे.

12 वर्षांनी भारतीय संघ अंतिम सामन्यात : 2011 च्या विश्वचषकानंतर भारतीय संघ यावेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे. यावेळी विश्वचषक ट्रॉफी भारतीय संघाकडं यावी अशी भारतातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून 19 धावांनी पराभूत झाल्यानंतर भारत विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. त्यानंतर लाखो चाहत्यांची मनं तुटली होती.

हेही वाचा :

  1. महामुकाबल्यासाठी भारतीय रेल्वेही सज्ज! अहमदाबादसाठी धावणार तीन 'वर्ल्डकप स्पेशल' ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
  2. कोणाला मिळणार 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार, 'हे' आहेत प्रमुख दावेदार
  3. वर्ल्ड कपचा भव्य समारोप समारंभ; वायुसेनेचा 'एअर शो', जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया फायनलपूर्वी काय विशेष तयारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.