ETV Bharat / state

Container Brakes Failed In Pune : भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् उडाला गोंधळ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

author img

By

Published : Feb 11, 2023, 11:02 PM IST

Updated : Feb 12, 2023, 6:12 AM IST

पुणे शहरातील नवले पूल परिसरात नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पूल चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे: नऱ्हे येथील भूमकर पूल चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने एकच हाहाकार उडाला. या अपघातातील एका क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने क्रेटा हवेत चेंडूसारखी उडाली. काही क्षणाकरिता तिथे असलेल्या नागरिकांना काय झाले हेच समजेना. तिथे असलेले वाहतूक कर्मचारी माधव गोपनर यांच्या जवळून कंटेनर गेला. ते थोडे जरी मागे-पुढे थांबले असते तर मोठा अनर्थ झाला असता. कंटेनरचालक पंकज महापात्रे (वय ५७ वर्षे, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हाहाकार: मिळालेली माहिती अशी की, शिरवळवरून फ्रिज व इतर साहित्य घेऊन निघालेला कंटेनर नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आला असता कंटेनर चे ब्रेक झाले. दरम्यान चौकात असणारे वाहतूक कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी त्वरित इतर रस्त्याने येणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कंटेनर समोर असणाऱ्या दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन जण जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

बसचे ब्रेक फेल : पुण्यातील वाकडेवाडी येथे 29 डिसेंबर, 2022 रोजी ब्रेक फेल झाल्याने पीएमपीएमएल बसने अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून कारमधील मागे बसलेल्या महिलेला संचेती येथे अ‍ॅडमिट केले आहे. दुचाकीवरील जखमी व्यक्तीला जहांगीर हॉस्पीटल येथे अ‍ॅडमिट केले. आहे. या अपघातात ब्रेक फेल पीएमपीएमएल बसने 200 ते 300 मीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक दिली. शेवटी पुढील 407 गाडीमुळे गाडी थांबली. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही.

कंटेनर शाळेत शिरला : ठाणे शहरात अचानक ब्रेक फेल झाल्याने कंटेनर शाळेची संरक्षक भिंत तोडून आत घुसल्याची घटना 6 मार्च, 2020 रोजी उल्हासनगर जवळील म्हारळ गावात घडली होती. अपघाताचा हा प्रकार महावीर विद्यालयामधील असून शाळा भरण्यापूर्वी हा अपघात घडल्याने मोठा अनर्थ टळला होता. उल्हासनगरजवळील म्हारळ गावातील रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास सिमेंट, रेतीच्या मिक्सरने भरलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. त्यावेळी हा कंटेनर महावीर शाळेची संरक्षक भिंत तोडून आत घुसला होता. विशेष म्हणजे शाळा भरण्यापूर्वी हा अपघात घडल्याने मोठा अनर्थ टळला. या शाळेसमोर मोठा उतरणीचा रस्ता असल्याने या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक ये-जा करत असतात. शिवाय रस्ता अरुंद असताना देखील मोठ्या वाहनांना या ठिकाणी प्रवेश दिला असल्याने गावकाऱ्यांमध्ये नाराजी आणि संताप आहे.

हेही वाचा : Anganwadi Worker Suicide : धक्कादायक! अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Last Updated :Feb 12, 2023, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.