ETV Bharat / state

Nana Patole Criticism BJP: भाजपा इंग्रजांच्या पेक्षा बत्तर; नाना पटोलेंची टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 6:58 PM IST

Nana Patole Criticism BJP
नाना पटोलेंची टीका

Nana Patole Criticism BJP: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली काल (शनिवारी) जीएसटी (Comparison of BJP with British) काऊंसिलची 52 वी बैठक पार पडली. (Nana Patole) यात मिलेट्सच्या पिठापासून ते अगदी मद्यापर्यंतच्या पदार्थांवरील (Congress State President Nana Patole) जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात (GST) आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी 1918 सालच्या खेडा कराराचा संदर्भ देत भाजपा इंग्रजांच्या पेक्षा बत्तर लोक असल्याची टीका भाजपावर केली आहे.

नाना पटोलेंची भाजपावर जहरी टीका

पुणे Nana Patole Criticism BJP: पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. आजच्या या बैठकीनंतर एकूण सहा जिल्हानिहाय आढावा बैठका या राज्यभर होणार आहेत आणि राज्यातील तसेच केंद्राच्या सरकारचा खरा चेहरा हा नागरिकांच्या समोर आणला जाणार आहे, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

इंग्रज तरी कुठेतरी विचार करायचे: नाना पटोले पुढे म्हणाले की, इंग्रज तरी कुठेतरी विचार करत होते; मात्र हे लोक तर शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांचे कसे नुकसान होईल याचा विचार करत आहेत. हे सरकार त्यांच्या मित्रांचा विचार करणारं; पण शेतकऱ्यांचा विचार करणारं नाही. म्हणून कालच्या जीएसटी परिषदेत असा निर्णय घेण्यात आला असल्याची टीका यावेळी नाना पटोले यांनी केली.

उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर: राज्यातील सरकार बाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, या राज्यात गरिबांना, शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही. हे स्वार्थी सरकार आहे. हे सरकार असंविधानिक आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर लागलेला आहे आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव होत असताना सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे, अशी टीका यावेळी नाना पटोले यांनी केली आहे.

जो पक्ष जिंकणार त्या पक्षाला जागा: काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढवणार असा प्रश्न नाना पटोले यांना विचारला असता ते म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीत असून आमच्या चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाने 48-48 जागांचा आढावा घेतला आहे. ज्या लोकसभेत जे काही वातावरण असेल आणि जो पक्ष जिंकणार असेल त्या पक्षाला ती जागा देण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय हा राष्ट्रीय पातळीवर होणार असल्याचे यावेळी नाना पटोले म्हणाले.


बसून चर्चा होऊ शकते: वंचित आघाडी बाबत नाना पटोले यांना विचारला असता ते म्हणाले की, अजून कोणताही प्रस्ताव आघाडीबाबत आलेला नाही आणि जे आमच्या सोबत नाही त्यांची का चर्चा करावी? मीडियामध्ये चर्चा पेक्षा यावर बसून चर्चा होऊ शकते, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा:

  1. Thackeray vs Shinde : ठाकरे गटाला झटका; आतापर्यंत 36 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
  2. Anna Hazare On Jitendra Awhad : अण्णा हजारे आणि जितेंद्र आव्हाड वाद पेटला; अण्णा हजारे दाखल करणार अब्रू नुकसानीचा खटला
  3. Pravin Darekar On Sanjay Shirsat : देवेंद्र फडणवीस हे मदारी नाही तर कारभारी आहेत; संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे - प्रविण दरेकर यांचा खोचक सल्ला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.