ETV Bharat / state

ED Raid at Nawab Malik Home : जातीय वाद निर्माण करणे हे शरद पवारांचे नेहमीचे प्रयत्न - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Feb 23, 2022, 3:31 PM IST

Updated : Feb 23, 2022, 4:20 PM IST

chandrakant patil
चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचं नेहमीच प्रयत्न असतात की, समाजा समाजात जातीयवाद निर्माण करणे. ते कधी मराठा विरुद्ध नॉन मराठा तर कधी अल्पसंख्याक विरुद्ध नॉन अल्पसंख्याक करत असतात. त्यांचे हे 50 वर्षांपासूनच चाललेले राजकारण सर्वांना माहीत झाले आहे. त्यामुळे मुस्लीम समाज एखाद्या वेळेस बरं मत असू शकतो. मात्र, नॉन मुस्लिम समाजाला माहीत आहे की त्यांचं हे राजकारण आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) यांनी केली.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचं नेहमीच प्रयत्न असतात की, समाजा समाजात जातीयवाद निर्माण करणे. ते कधी मराठा विरुद्ध नॉन मराठा तर कधी अल्पसंख्याक विरुद्ध नॉन अल्पसंख्याक करत असतात. त्यांचे हे 50 वर्षांपासूनच चाललेले राजकारण सर्वांना माहीत झाले आहे. त्यामुळे मुस्लीम समाज एखाद्या वेळेस बरं मत असू शकतो. मात्र, नॉन मुस्लिम समाजाला माहीत आहे की त्यांचं हे राजकारण आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) यांनी केली.

माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी सकाळी ईडी कार्यालयातील अधिकारी आले ( ED Raid on Nawab Malik Home ) आणि त्यांनी कोणतीही नोटीस न देता त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी घेऊन गेले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी टीका केली. ( Sharad Pawar Criticize ED Raid at Nawab Malik Home ) ते म्हटले की मुस्लिम आहे म्हणून दाऊदशी संबंध जोडलं जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे महापालिका आयुक्त यांची विविध विषयांवर भेट घेतली. त्यांनतर ते बोलत होते.

अनिल देशमुखांसारखे होऊ देऊ नका -

तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे आणि त्याचा वापर भाजप करत असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेते मंडळी करत आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, असे विरोधकांना म्हणायचं असतं. त्याचे स्वागतच केले पाहिजे. जसे अनिल देशमुख यांच्याबाबतीत सुरुवातीला म्हणता म्हणता आवाज नंतर शांत झाला तसे आणि आत्ता विचारत आहेत. अनिल देशमुख कोण? असे आत्ता होऊ देऊ नका, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा - Yashomati Thakur On Ed : पुन्हा येईन.. यासाठीच ईडीच्या कारवाया! - ॲड. यशोमती ठाकूर

कर नाही त्याला डर कशाला? -

या देशातील न्यायालय अजूनही रामशास्त्री बाणाने निर्णय घेत आहे. त्यांना वाटतंय की, तपास यंत्रणेचा दुरुपयोग सुरू आहे. तर त्यांनी न्यायालयात जायला हवं. महाविकास आघाडी 28 महिन्यात एकही केस न्यायालयात जिंकू शकलेलं नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. जर काहीच केलं नाही तर एवढं घाबरताय कशाला? काहीच केले नसेल तर घाबरू नका ना. न्यायालयात जा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मी अंदाज व्यक्त केला -

10 मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार पडेल, असा मी अंदाज व्यक्त केला आहे. चंद्रावर कस जायचं, सूर्याचा अंदाज मी देऊ शकतो, असे अंदाज मी देऊ शकतो. ही तर निवडणूक आहे. माझ्या बोलण्यावर तरी बंधने आणू नका. मला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही गलिच्छ बोलतात. त्याला परवानगी आणि मी अतिशय सुसंस्कृत बोलतो तर त्याला परवानगी नाही का? असा सवाल देखील पाटील यांनी यावेळी केला.

Last Updated :Feb 23, 2022, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.