ETV Bharat / state

Ajit Pawar on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर अजित पवारांची टीका; म्हणाले...

author img

By

Published : Jun 5, 2023, 3:42 PM IST

शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली. या बैठकीला आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला.

Ajit Pawar Criticism On  CM
अजित पवार

माहिती देताना अजित पवार

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली वारीवर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला आमचे पडले आहे. कोणी दिल्ली वारी करावी की, सुरत वारी करावी की, गोवा वारी करावी की, नाहीतर कोणती तिसरी वारी करावी. आम्हाला आमचे पडले आहे. आम्हाला तर आता माऊलींची वारी निघणार आहे, ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही साधू संताचे विचार पुढे घेऊन जाणारे लोक आहोत, आम्हाला ती वारी महत्त्वाची असल्याचे यावेळी पवार म्हणाले.



राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन: राष्ट्रवादी काँग्रेसचा येत्या 10 तारखेला वर्धापन दिन असून 9 तारखेला नगरमध्ये आम्ही एक सभा घेत आहोत. इथे सभा घेत असताना नगरला लागून असलेले बीड, नाशिक, पुणे या तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर यावे असे नियोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज जालना, भिवंडी आणि शिरूर लोकसभा मतदार संघाच आढावा घेण्यात येत आहे. असे यावेळी पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली वारीवर पवार म्हणाले, कोणी दिल्ली वारी करावी की, सुरत वारी करावी की, गोवा वारी करावी की, नाहीतर कोणती तिसरी वारी करावी. आम्हाला आमचे पडल आहे. - विरोधी पक्ष नेते अजित पवार



सरकार येऊन एक वर्ष झाला: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली आहे. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने आम्हाला चांगल बोलावे अशी अपेक्षाच आम्ही करू शकत नाही. आमच्या बद्दल टीकात्मक बोलणे हे त्यांचे जन्मसिद्ध हक्क आहे. त्या प्रमाणे ते बोलत असतात. आम्ही त्यांना जास्त महत्त्व देत नाही.आम्हला माहीत असून जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो, तेव्हा ओबीसीला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज त्यांचे सरकार येऊन एक वर्ष झाला आहे. या एक वर्षात त्यांनी तरी निवडणुका घेतल्या का? नाही ना मग कश्याला आमच्यावर टिका करायची असे देखील यावेळी पवार म्हणाले.



महिलांना संधी देणे योग्य वाटले नसेल: मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, तो त्यांचा सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अधिकार असून त्यांना वाटले असेल की, 20 लोकांच मंत्रिमंडळ चांगल्या पद्धतीने काम करू शकत असेल. महिलांना संधी देणे योग्य वाटले नसेल ते त्यांचा अधिकार असल्याचे यावेळी पवार म्हणाले.



अधिकृतरित्या पोस्टर: पिंपरी चिंचवडला जिजाऊ नगर नाव द्या अशी मागणी, आता करण्यात येत आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अलीकडे प्रत्येकाला त्याच मत मांडण्याचा अधिकार आहे. तसेच पोस्टर लावण्याचा देखील अधिकार आहे. फक्त त्याने अनधिकृत नव्हे तर अधिकृतरित्या त्याने ते लावावे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला असल्याचे यावेळी पवार म्हणाले.



मताचे विभाजन होऊ नये : मुंबई महापालिकेत शिवसेनेबरोबर आघाडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांची तिथे ताकद आहे म्हणून ते विधान केले होते. आमची ताकद तिथे मुळातच कमी आहे. मताचे विभाजन होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून यावे यासाठी ते विधान केले होते. तसेच पुणे, पिंपरी आणि नाशिकसाठी त्या त्या जिल्ह्याला अधिकार देण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Mahavikas Aghadi महाविकास आघाडीचे हिरो संजय राऊत आता का ठरतायेत व्हीलन
  2. Ajit Pawar Future Politics अजित पवार यांच्या भविष्यातील राजकारणाकडे सर्वांचे लक्ष आता पुढे काय
  3. Maharashtra Political Crisis उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळालाअजित पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.