ETV Bharat / state

Ajit Pawar Future Politics : अजित पवार यांच्या भविष्यातील राजकारणाकडे सर्वांचे लक्ष; आता पुढे काय?

author img

By

Published : May 6, 2023, 7:09 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा शरद पवारांनी स्वीकारल्याची जाहीर घोषणा केल्यानंतर अध्यक्ष पदाच्या शर्यतीमधील नावांना पूर्णविराम मिळाला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाले आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवारांची भविष्यातील वाटचाल काय असू शकते या संदर्भात राजकीय विश्लेषकांना काय वाटते या संदर्भात माहिती जाणून घेऊया.

Ajit Pawar Future Politics
Ajit Pawar Future Politics

राजकीय विश्लेषक शंकर नारायण तिवारी यांची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी आपला राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतल्यावर कार्यकर्त्या आणि नेत्यांमध्ये प्रेम,जोश, उत्साह भरल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार पहिल्यांदाच अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत होते असा भास कार्यकर्त्यांना होत होता अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक शंकर नारायण तीवारी यांनी दिली आहे .

अजित पवार दुखावले गेले? दोन मे रोजी शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी कार्यकारी समितीच्या ठरावानुसार आपला राजीनामा काल मागे घेतला आहे. मात्र ज्या प्रकारे चित्र उपस्थित करण्यात आले. त्यानुसार ते पहिल्यांदाच राष्ट्रवादी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळात असल्याचे पाहायला मिळाले. एकंदरीत या प्रकारामुळे अजित पवार दुखावले गेले आहे असे वाटत आहे, असे तीवारी म्हणाले. अजित पवार सध्या घायाळ झालेले आहे. भविष्यात ते काही करणार नाही असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. शरद पवार यांनी राजीनामा देतेवेळी अजित पवार त्यांच्या बाजूला होते. त्या वेळी राजीनामा योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. अजित पवारांचे मत एका बाजूला तर, राष्ट्रवादी नेते, कार्यकर्ते हे एका बाजूला होते. त्यामुळे अजित पवारांना बाजुला केल्याच्या चर्चा सगळीकडे रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीत राहून गेम करणार? अजित पवार आता काय करणार भाजपासोबत जाणार की राष्ट्रवादीत राहून गेम करणार हे ते स्वतःच याबद्दल निर्णय घेऊ शकतात. यासंदर्भात कोणीही भविष्यवाणी करू शकत नसल्याचं राजकीय विश्लेषक शंकर नारायण तिवारी यांनी सांगितले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार नेमके गेल्या दोन दिवसापासून शांत असल्यामुळे त्यांच्या संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. भविष्यातील राजकारणात ते कोणते पाऊल उचलतात हा येणारा काळच ठरवणार आहे.

अजित पवार गायब असल्याच्या चर्चेला उधान : शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला तेव्हापासून अजित पवार गायब असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. अजित पवार नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्यानंतर अजित पवार नाराज आहेत का असा सवाल विरोधक उपस्थित करीत आहे. राष्ट्रवादीचा पुढचा वारस कोण असणार? केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवारांकडे जबाबदारी देण्याचे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे राष्ट्रवादीत काही चित्र वेगळे पहायला मिळणार आहे.


  • हेही वाचा -
  1. RSS VHP Bajrang Dal : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा काय आहे संबंध?
  2. Baramulla Encounter : बारामुल्ला चकमकीत 1 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरूच
  3. Support Barsu refinery : मातोश्रीवर खोके पोहोचावे यासाठी ठाकरेंचा रिफायनरीला विरोध, समर्थन मोर्चात राणेंची सडकून टिका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.