ETV Bharat / state

Aaditya Thackeray: राज्यात सत्तांतर झालं अन् Vedanta Foxconn प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला.. आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

author img

By

Published : Sep 24, 2022, 5:24 PM IST

Updated : Sep 24, 2022, 7:23 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Aaditya Thackeray: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यातील तळेगावात जनआक्रोश आंदोलन Aaditya Thackeray Janakrosh Agitation सुरु झाले आहे.. महाराष्ट्रातील १ लाख तरुणांना नोकऱ्या देणारा Vedanta Foxconn प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा निषेध करण्यात येत आहे. राज्यात सत्तांतर झालं अन् प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, Vedanta Foxconn Project अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला Aaditya Thackeray Criticized Shinde Government आहे.

पुणे : Aaditya Thackeray: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यातील तळेगावात जनआक्रोश आंदोलन सुरु झाले आहे.. महाराष्ट्रातील १ लाख तरुणांना नोकऱ्या देणारा Vedanta Foxconn प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा निषेध करण्यात येत आहे. राज्यात सत्तांतर झालं अन् प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, Vedanta Foxconn Project अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला Aaditya Thackeray Criticized Shinde Government आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प Vedanta Foxconn Project गुजरातला गेला. त्याच्या निषेधार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन होत आहे. वडगाव मावळमधील ग्रामदैवत पोटोबा मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत जनआक्रोश आंदोलन झालं. या आंदोलनाच सभेमध्ये रूपांतर झालं. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना संबोधित केलं.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "गुजरातपेक्षा दहा हजार कोटी रूपयांची जास्त सबसीडी आपण देणार होतो. शिवाय आता गुजरातमध्ये हा प्रकल्प बनत आहे त्यापेक्षा जास्त सुविधा महाविकास आघाडी सरकारने दिल्या होत्या. तरी देखील हा प्रकल्प गुजरातला गेला. आपल्या मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हतं की, फॉक्सकॉन प्रकल्प काय आहे आणि तो कोठून आलाय. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा फायदा घेत गुजरातनं हा प्रकल्प आपल्या राज्यात नेला. हा प्रकल्प गुजरातला गेला यात गुजरातचा आणि केंद्राचा दोष नाही तर राज्य सरकारच्या ना कर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला, अशी टीका आदित्य टाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारवर केली.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे.महाविकास आघाडीचं सरकार असंत तर हा प्रकल्प महाराष्ट्रात शंभर टक्के आणला असता. परंतु, आज राज्यात कंपन्या येतात की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकल्प कोणत्या राज्यात गेला याचं वाईट वाटत नाही.आपल्या तरूणांचा रोजगार बाहेर गेला यामुळे तरूणांच्या मनात सरकार विषयी रोष आहे, असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मोठा खुलासा केला. वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता तो आता महाराष्ट्राबाहेर गेल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत. गुंतवणूक कोण घेऊन येतंय, याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. जो प्रकल्प महाराष्ट्रात येणं गरजेचं होतं. जो येऊ शकत होता. तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रातून एक-एक प्रकल्प बाहेर जात आहेत. शंभर टक्के तळेगावात येणारा प्रकल्प सरकार बदलल्यानंतर पळवलाच कसा ? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकार असतं तर प्रकल्प गेलाच नसता, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वतः साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Last Updated :Sep 24, 2022, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.