ETV Bharat / state

परभणी: येलदरी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले, पूर्णा नदीला पूर

author img

By

Published : Aug 18, 2020, 7:55 PM IST

येलदरी धरण
येलदरी धरण

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून येणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्यामुळे धरणाचे सर्व १० दरवाजे दीड मीटरने उघडण्यात येवून सध्या ६० हजार ९०१ क्युसेक (१ हजार ७२४ क्युमेक) एवढ्या वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. प्रचंड वेगाने पाणी नदीपात्रात पडू लागल्याने येलदरी धरणाखालील पूल पाण्याखाली गेला असून त्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल मराठवाड्याला विदर्भाशी जोडतो. त्याद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मार्गे पुढे विदर्भात जाता येते.

परभणी - पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी धरणाचे सर्वच्या सर्व १० दरवाजे उघडण्यात आल्याने पूर्णा नदीस पूर आला आहे. धरणाखालील विदर्भाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून, परभणी जवळच्या रहाटी येथील पूर्णा नदीला पूर आला आहे. दरम्यान, येलदरी धरण यंदा १०० टक्के भरल्याने परभणी, हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून येणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्यामुळे धरणाचे सर्व १० दरवाजे दीड मीटरने उघडण्यात येवून सध्या ६० हजार ९०१ क्युसेक (१ हजार ७२४ क्युमेक) एवढ्या वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. प्रचंड वेगाने पाणी नदीपात्रात पडू लागल्याने येलदरी धरणाखालील पूल पाण्याखाली गेला असून त्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल मराठवाड्याला विदर्भाशी जोडतो. त्याद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मार्गे पुढे विदर्भात जाता येते.

दरम्यान, आज (मंगळवारी) धरणाची पाणीपातळी ४६१.६५० मीटर इतकी असून, सद्यस्थितीत ९२१.६८१ दलघमी (३२.५५ टी.एम.सी) इतका पाणीसाठा जलाशयात आहे. यात ७९७.४ दलघमी जिवंत पाणी साठा असून, या जिवंत पाण्याची टक्केवारी ९८.४२ टक्के इतकी आहे. धरणात मागील २४ तासात ११८.८३ दलघमी इतकी आवक झाली असल्याची माहिती पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच येलदरी धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्प देखील सुरू झाला आहे.

बुधवारी (१२ ऑगस्ट) पासून दररोज ३ संचाच्या माध्यमातून २२.५ मे.वॅट विजेची निर्मिती होत आहे. तर आतापर्यंत २२ लाख ७५ हजार युनिट विजेची निर्मिती झाली आहे. दरम्यान, पूर्णा नदीत प्रचंड वेगाने वाहणाऱ्या या पाण्यामुळे रहाटीपर्यंत आणि पुढे पूर्णा शहरापर्यंत नदी पत्रात पूर आला आहे. नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. येलदरी हा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असून त्यात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने येणाऱ्या वर्षभरात जिल्ह्यातील शेकडो गावांसह हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील असंख्य गावांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. विशेष म्हणजे, परभणी शहराला याच धरणातून पाणी पुरवठा होतो. ज्यामुळे आगामी काळात परभणी शहराला पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही.

हेही वाचा- कोरोनाचा कहर; नवा मोंढा पोलीस ठाण्यातील दुसरा कर्मचारीही बाधित, 2 रुग्णांचा दुपारपर्यंत मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.