ETV Bharat / state

चिंचणी समुद्रकिनारी धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक

author img

By

Published : Jul 12, 2021, 9:24 PM IST

tourists attack on police at Chinchani beach  in palghar
चिंचणी समुद्रकिनारी धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला

समुद्रकिनारी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता, तीन पर्यटकांनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.

पालघर - चिंचणी समुद्रकिनारी मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समुद्रकिनारी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता, तीन पर्यटकांनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.

व्हिडीओ

मद्यपी पर्यटकांचा धिंगाणा; पोलिसांवरच हल्ला -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सध्या पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी आहे. मात्र, रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर मुंबई येथून काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. हे पर्यटक मद्य प्राशन करुन धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या या मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी मद्यपी पर्यटकांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालून धक्काबुक्की करत हल्ला केल्याचा प्रकार घडला, हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. पर्यटकांनी आपली गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला जात आहे.

तिघांवर गुन्हा दाखल -

चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 3 पर्यटकांना वाणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाणगाव पोलीस ठाण्यात 3 पर्यटकांवर भादंवि सहकलम 353, 351, 188, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, मंगळवार 13 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - पंकजा मुंडे उद्या घेणार नाराज समर्थकांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.