ETV Bharat / state

उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपावर डिझेलऐवजी चक्क पाणी.. वाहनचालकांना नाहक मनस्ताप

author img

By

Published : Sep 8, 2020, 7:29 PM IST

उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपावर डिझेल ऐवजी पाणी..
उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपावर डिझेल ऐवजी पाणी..

शहरात असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आलेल्या गाड्यांमध्ये चक्क पाणी भरल्याची घटना घडली आहे. यामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. या ग्राहकांना गाडी दुरुस्तीसाठी आलेला खर्च पोलीस पंप चालकाकडून देण्यात आला.

उस्मानाबाद - शहरात असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आलेल्या गाड्यांमध्ये चक्क पाणी भरल्याची घटना घडली आहे. यामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान, या ग्राहकांना गाडी दुरुस्तीसाठी आलेला खर्च पोलीस पंप चालकाकडून देण्यात आला.

उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपावर डिझेल ऐवजी पाणी..

आज (मंगळवार) सकाळी या पंपावर डिझेल भरून गेलेल्या गेलेल्या गाड्यांमध्ये डिझेल ऐवजी पाणी भरण्यात आले आहे. एचडीएफसी बँकेचे अधिकारी प्रवीण कुलकर्णी आज सकाळी गाडीत डिझेल भरण्यासाठी गेले होते. त्यांनी 1 हजार रुपयांचे डिझेल भरले आणि पंपापासून काही अंतरावर जाताच गाडी बंद पडली. त्यानंतर गाडीला काय झाले, हे पाहण्यासाठी मेकॅनिकला बोलवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कुलकर्णी यांनी ही गाडी ढकलत पुन्हा पंपावर आणली त्यानंतर इतर वाहनचालकही आपल्या बिघडलेल्या गाड्या घेऊन पंपावर दाखल झाले होते.

यावेळी ईटीव्ही भारतने यासंबंधी पंप व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, यासंबंधी वरिष्ठांकडे माहिती दिली असून कॅमेऱ्यासमोर काही बोलू शकत नाही, असे सांगण्यात आले. यानंतर काही वेळानंतर या ग्राहकांना गाडी दुरुस्तीसाठी आलेला खर्च पोलीस पंप चालकाकडून देण्यात आला. मात्र, लोकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.