ETV Bharat / state

कृषीमंत्री दादा भुसेंच्या मालेगावमधील घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

author img

By

Published : Nov 4, 2021, 4:34 PM IST

Updated : Nov 4, 2021, 8:01 PM IST

agitation
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.

नाशिक - राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने थैमान घातले होते. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सणासुदीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी 'कडू' होत असताना मंत्र्यांची दिवाळी 'गोड' होऊ द्यायची नाही, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया देताना पूजा मोरे आणि दादा भुसे

हेही वाचा - पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचे असेल तर भाजपला देशभर पराभूत करावे लागेल का?; संजय राऊतांचा सवाल

मंत्र्यांना गोड दिवाळी का साजरी करू द्यायची? -

आंदोलन दरम्यान, कृषीमंत्री भुसे यांनी, स्टंटबाजी आंदोलन न करता चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लावू असे हात जोडून विनंती केली. दरम्यान, 'स्टंटबाजी' या शब्दावर आक्षेप घेत आंदोलकांनी यावेळी कृषिमंत्र्यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. आंदोलकांना समर्पक असे उत्तरे मिळाल्यावर गोड फराळ घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले. जर पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे एक महिन्याच्या आत वर्ग केले नाही, तर राज्यातील 50 हजार शेतकऱ्यांसह मंत्री दादा भुसे यांना घेऊन पिक विमा कंपन्यांसमोर आंदोलन करण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यानी सांगितले आहे.

आंदोलकांच्या मागण्या -

अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी

अनुदानासह पिक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळावा

विनापंचनामा हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी

शेतकऱ्यांची वीज बिल वसुली व विजतोडणी करू नये

फळबाग विमा व पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा

हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू

Last Updated :Nov 4, 2021, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.