ETV Bharat / state

Sanjay Raut On Shinde Group : अजित पवारांना अर्थ खाते नको तर तुमचे मुख्यमंत्रीपद द्या, शिंदेंना होती ऑफर - संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

author img

By

Published : Jul 15, 2023, 6:49 PM IST

तुमचे मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे द्या असा प्रस्ताव एकनाथ शिंदेंना दिल्लीत दिला होता असा गौप्यस्फोट शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे गटाने अजित पवारांकडे अर्थखाते देऊ नये यासाठी प्रयत्न केले, असे देखील राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Shinde Group
Sanjay Raut On Shinde Group

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

नाशिक : सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर शिंदे गटाने त्यांच्याकडे अर्थखाते देऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत अजित पवार यांना अर्थमंखाते द्यायचे नसेल तर अर्थखाते तुमच्याकडे ठेवा. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद द्या, असा प्रस्ताव ठेवल्याने शिंदे गट बॅकफूटवर आल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता शिंदे गटाला अजित पवारांची धुणीभांडी करावीच लागतील असा टोलाही राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे गटाला धुणीभांडी करावीच लागेल : अजित पवार आमच्यासोबत नको, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे होते. आता त्यांना टाळ्या वाजवण्याशिवाय पर्याय नाही. शिंदे गटाला अजित पवार यांची धुणीभांडी करावी लागेल. यावेळी त्यांनी शिंदे गट, अजितदादा गटात जमीन अस्मानचा फरक आहे. अजितदादा गटातील नेत्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भोगले आहे. अजित दादांना अर्थमंत्री पदाचा अनुभव आहे. मात्र, अजित पवार यांचा निर्णय योग्य नाही. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राचे भले होणार नाही, असेही खासदार राऊत म्हणाले.

जनता कोणाच्या दारात लवकरच कळेल : शासन आपल्या दारी कार्यक्रमात जनता त्यांच्या दारात जात नाही. शासन जरी त्यांच्या दारात जाण्याचा प्रयत्न करत असले, तरी जनता त्यांना फारसे महत्व देत नाही. हे सरकार जनतेच्या मनातले नाही. मी जे अध्यादेश पाहतो आहे, कार्यक्रमाला रेशन दुकानदारांना, शैक्षणिक संस्थांना पन्नास माणसे आणण्याचा कोटा दिला आहे. हा जनतेचा कार्यक्रम होऊ शकत नाही.

कार्यक्रमाला माणसे जबरदस्तीने आणली : जर मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार जनतेत येत आहे, तर जनतेने त्यांना उस्फुर्त प्रतिसाद दिला पाहिजे. पण तसे दिसत नाही. शासनाच्या कार्यक्रमाला माणसे जबरदस्तीने आणली जाते आहेत, असे सरकारी आदेश मी पाहिले. रस्त्यात खड्डे असल्याने अजित दादा ट्रेनने आले. आम्ही काल मुंबईहून येताना सहा तास अडकलो. या खड्यातून जनतेने यायचे, मंत्र्यांनी यायचे नाही, असे चित्र आहे. लवकरच जनता कोणाच्या दारात आहे? जनतेच्या मनात कोण आहे, हे लवकरच कळेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा - CM Eknath Shinde : 'फडणवीस राजकारणातील निष्कलंक माणूस; सकाळचा नऊचा भोंगा बंद करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.