ETV Bharat / state

Woman Corporator Death Nashik : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपू्र्वी नगरसेवकांच्या सहलीत गेलेल्या नगरसेविकेचा मृत्यू

author img

By

Published : Feb 13, 2022, 7:48 PM IST

Death of a woman corporator in nashik
नगरसेविकेचा मृत्यू

नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सहलीत गेलेल्या भाजप नगरसेविकेचा मृत्यू झाला. ( Woman Corporator Death Nashik )

नाशिक - जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सहलीत गेलेल्या भाजप नगरसेविकेचा मृत्यू झाला. ( Woman Corporator Death Nashik ) मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये नगरसेविकेला आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. भाजपची सहल नगरसेविकेच्या जीवावर बेतल्याची चर्चा रंगली आहे.

सत्तेचे राजकारण पुन्हा एकदा वादात -

सुरगाणा नगरपंचायतीत वार्ड क्रमांक १६ मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी अगोदर दगाफटका नको म्हणून भाजपने नगरसेवकांची सहल काढली होती. निवडणुकीच्या ऐनवेळी अगोदर येऊन बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खुर्चीच्या राजकारणात नगरसेविकेला काळाने गाठल्याने भाजपचे सत्तेचे राजकारण पुन्हा एकदा वादात सापडले आहे.

या घटनेमुळे सुरगाणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काशीबाई पवार यांच्या सूनबाई अमृता पवार यादेखील सुरगाण्यात नगरसेविका असून या घटनेवेळी त्यादेखील काशीबाई यांच्या सोबतच हॉटेलमध्ये होत्या. काही दिवसांपासून काशीबाई पवार कुटुंबासह महाराष्ट्राबाहेर फिरायला गेल्या असतानाच शनिवारी रात्री दोन्ही नगरसेविका भाजपच्या सहलीत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे १५ फेब्रुवारीला होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीत पेच निर्माण झाला आहे. सुरगाण्यात भाजपचे विजय कानडे आणि शिवसेनेचे भारत वाघमारे यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपला एका मताची गरज होती म्हणून नगराध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये चढाओढ निर्माण झाली होती.

हेही वाचा - Muskan Khan Name For Urdu House : मालेगावच्या उर्दू घराला मुस्कानचे नाव देणार; महापौर ताहेरा शेख यांची घोषणा

सुरगाणा नगरपंचायत एकूण नगरसेवक संख्या -

  • एकूण जागा – 17
  • भाजप – 08
  • शिवसेना – 06
  • माकप – 02
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 01
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.