ETV Bharat / state

Samruddhi Highway Accident: कार दुभाजकावर आदळल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात, चार जण ठार

author img

By

Published : Jun 12, 2023, 1:03 PM IST

Samruddhi Highway Accident
समृद्धी अपघात

मृद्धी महामार्गावरील शिर्डी- भरवीर या दुसऱ्या टप्प्यात भीषण अपघात झाला आहे. रविवारी मध्यरात्री सिन्नर जवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक: नव्याने उद्घाटन केलेल्या शिर्डी -भरवीर महामार्गावर सिन्नर परिसरात भीषण अपघात झाला आहे. रविवारी मध्यरात्री इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातत चार जण जखमी झाले आहेत, त्यामुळे नेहमी होणाऱ्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग अपघाताचे केंद्र बनत चालल्याचे चित्र आहे.



कसा झाला अपघात? हज यात्रेसाठी मुंबई येथे सोडून इनोवा कारमधील प्रवासी शिर्डीकडे परतत होते. रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास सिन्नर हद्दीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील खापराळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे इन्होवा कारने येत होती. यावेळी चालकाचे अचानक कारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील रज्जाक अहमद शेख, सत्तार शेख लाल शेख, सुलताना सत्तार शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर मैरूनिसा रज्जाक शेख, अझर बालन शेख, मुस्कान अजर शेख, जुबेर रज्जाक शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिन्नर येथे प्राथमिक उचारानंतर शिर्डी येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.


समृद्धी महार्गावर अपघाताची कारणे: समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर 100 दिवसांतच तब्बल 900 अपघात आणि 31 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वाहनांचा अतिवेग, तांत्रिक बिघाड, टायर पंक्चर झाल्यामुळे चालक झोपी जाणे अशी अपघाताची कारणे आहेत. याचबरोबर शिवाय लेनची शिस्त न पाळणे, माकडा व वन्यप्राणी रस्त्यावर अचानकपणे आडवे आल्यानेही अपघात घडले आहेत. मात्र आजवर झालेले बहुतांश अपघात हे ‘साईड डॅश’मुळे झाले आहेत. ही अपघाताची सुरुवातीला प्रमुख कारणे सांगितली गेली आहेत. समृद्धीवर वळणे कमी असली, तरी अतिवेगाची धुंदी अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघात टाळण्यासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते.

हेही वाचा-

  1. Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट
  2. Doctors Accident Death: उतारावर अनियंत्रित कार झाडावर आदळली; दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू
  3. Nashik Accident : कसारा घाटात अपघात; चातुर्मासासाठी पायी निघालेल्या दोन महिला साध्वींचा जागीच मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.