ETV Bharat / state

नाशिकच्या 174 गावात 'एक गाव, एक गणपती' संकल्पना

author img

By

Published : Aug 24, 2020, 4:50 PM IST

नाशिकच्या 174 गावात एक गाव, एक गणपती संकल्पना
नाशिकच्या 174 गावात एक गाव, एक गणपती संकल्पना

नाशिक जिल्ह्यातील एकूण 324 सार्वजनिक मंडळांनी सध्या पध्दतीने बाप्पाची प्रतिष्ठापना केली. तर 174 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली, असे एकूण नाशिक जिल्ह्यात 496 मंडळानीं बाप्पाची स्थापना केली आहे.

नाशिक- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना काही सूचना केल्या होत्या. तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी यंदाचा गणेशोत्सव साध्यापद्धतीने साजरा करावा, अशी मंडळांना विनंती केली होती. याला नाशिकच्या ग्रामीण भागातील मंडळांनी प्रतिसाद देत नाशिकच्या तब्बल 174 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे.

नाशिक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आता पर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा 30 हजार पार गेला आहे. यात सर्वाधिक नाशिकच्या निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी, बागलाण, लासलगाव, सिन्नर, नांदगाव तसेच मालेगाव ग्रामीण भागात 7 हजार हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यात 212 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अशात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव सध्या पध्दतीने साजरा करावा अशा सूचना नाशिक ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना दिल्या होत्या.

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नाशिक जिल्ह्यातील एकूण 324 सार्वजनिक मंडळांनी सध्या पध्दतीने बाप्पाची प्रतिष्ठापना केली. तर 174 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली, असे एकूण नाशिक जिल्ह्यात 496 मंडळांनी बाप्पाची स्थापना केली आहे. मागील वर्षी ग्रामीण भागात एकूण 2 हजार 840 सार्वजनिक मंडळांनी श्रींची स्थापना केली होती.

येत्या 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक काढण्याला परवानगी देण्यात आली नाही. यावर्षी बाप्पाला ढोल ताशाचा गजरात निरोप न देता शांततेत गणेश विसर्जन करावे, असं आवाहन पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.