ETV Bharat / state

'या' गावांच्या फक्त नावातच 'पाणी', तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना अशी करावी लागते कसरत

author img

By

Published : May 18, 2019, 2:39 PM IST

Updated : May 19, 2019, 3:14 PM IST

गावकऱ्यांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट

नंदुरबारमधील आंबापाणी आणि केवलापाणी पाड्यातील लोकांना हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

नंदुरबार - शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाणीटंचाई अधिक तीव्र होत आहे. याठिकाणच्या आंबापाणी आणि केवलापाणी पाड्यातील लोकांना हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यांना मिळेल ते दुषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे.

पाणीटंचाई

शहादा शहरापासून २५ किलोमीटरवर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये केवलापणी आणि आंबापाणी ही दोन गावे आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १२ पाडे असून याचे क्षेत्र जवळपास ७ किलोमीटर परिसरात विस्तारलेले आहे. याठिकाणी जवळपास १५०० ते २००० हजार लोकसंख्या आहे. मात्र, तरीही शासनातर्फे येथे कोणतीच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठा वणवण करावी लागत आहे.

गावातील हातपंपांची पाणीपातळी खोल गेल्याने गावकऱ्यांना पिण्याचा पाण्यासाठी डोंगर रांगामध्ये जाऊन झऱ्याचे किंवा आटलेल्या नदीच्या डबक्यातील पाणी आणावे लागते. या गावातील महिला आणि मुलांचा पूर्ण दिवस पाणी आण्यातच जातो. गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून गावात कायम स्वरुपी पाणी योजना सुरू कराव्यात, यासाठी शासनाकडे मागणी केली. मात्र, त्यांच्या पदरी फक्त निराशा पडली पडली आहे.

भीषण दुष्काळामुळे याठिकाणची पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील गावांपासून ४ ते ५ किलोमीटर परिसरात पाण्याचे स्त्रोत असल्याने त्याठिकाणाहून पाण्याची उपाय योजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या गावाच्या नावामध्ये पाणी असले तरी या गावकऱ्यांना पाण्यासाठीचा संघर्ष नित्याचा झाला आहे. प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात दंग आहे. या टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाय योजना कधी होतील, हा एकच प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

Intro:ANCHOR :- शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे सातपुड्याचा डोंगर रांगा मध्ये पिण्याचा पाण्यासाठी फिरफिर वाढली असून हंडा बर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर ची पायपीट करावी लागते तरी हाती मिळेल ते दुषित पाणी पिऊन गावकर्यांना तहान भागवावी लागत आहे आंबापाणी आणि केवलापाणी या गाव पाड्याच्या पाणी टंचाई वरील एक खास रिपोर्ट ..............

Body:VO :- शहादा शहरापासून २५ किलोमीटर वर सातपुड्याचा डोंगर रांगा मध्ये केवलापणी आणि आंबापाणी हे गावे असून या च्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १२ पडे असून या ग्रामपंचायतीचे क्षेत्र जवळपास ७ किलोमीटर परिसरात विस्तारित आहे तर जवळपास १५०० ते २००० हजार लोकसंख्या आसलेल्या या गावा मध्ये पाण्याची समस्या अधिक तीव्र,झाली आहे या गावामध्ये असलेल्या हात पंपांची अवस्था हि पाणीपातळी खोल गेल्याने बिकट झाली असून गावकर्यांना पिण्याचा पाण्यासाठी डोंगर रंगामध्ये जाऊन एखाद्या झऱ्याचे किवा आटलेल्या नदीच्या डबक्यातील पाणी पिण्यासाठी आणावे लागते मात्र या पाण्यासाठी गावतील महिला आणि मुलांचा पूर्ण दिवस पाणी आण्यात वाया जात आसतो या गावकर्यांनी अनेक वर्षा पासून गावात कायम स्वरूपी पाणी योजना सुरु व्ह्यात म्हणून शासन दरबारी तक्रारी केल्या मात्र त्यांच्या पदरी पडली आहे ती निराशा


BYTE निवास वळवी गावकरी


VO या गावातील पाणी टंचाई कायम स्वरूपी दूर व्हावी आणि गावकर्यांना पुरपूर पाणी मिळावे म्हणून आम्ही संघर्ष केला मात्र भीषण दुष्काळामुळे पाण्याची पातळी खालावली आहे मात्र सातपुड्याचा डोंगर रांगा मध्ये गावापासून चार ते पाच किलोमीटर परिसरात पाण्याचे स्त्रोत्र असल्याने त्याठीकाना हून पाण्याची उपाय योजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे
Conclusion:VO गावाच्या नावामध्ये पाणी असल तरी या गावकर्याना पाण्यासाठीचा संघर्ष नित्याचा झाला आहे प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे या टंचाई ग्रस्त गावांमध्ये उपाय योजना कधी होतील हा एक प्रश्न आहे.
Last Updated :May 19, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.