ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यातील २०० वर्षांच्या जगदंबादेवी मिरवणुकीत खंड

author img

By

Published : Apr 2, 2021, 4:54 PM IST

Updated : Apr 2, 2021, 5:09 PM IST

जगदंबादेवी मिरवणूक
जगदंबादेवी मिरवणूक

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्यात आली होती. मात्र यंदा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुखवटा दर्शन फेसबुक व गुगल मॅपद्वारे ऑनलाइन दाखविली जाणार असल्याची माहिती मांगल्य सेवा समितीतर्फे देण्यात आली आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात होळी उत्सवाची मोठी परंपरा आहे. जिल्ह्यातील होळी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे होळीनंतर पाच दिवसांनी साजरा होणारी रंगपंचमीच्या दिवशी सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या जगदंबा देवीची मिरवणूकदेखील प्रसिद्ध आहे. जगदंबा देवीची मिरवणूक रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी शहरातील कमान दरवाजापासून सुरू होत गणपती मंदिर येथे समाप्त होते. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्यात आली होती. मात्र यंदा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुखवटा दर्शन फेसबुक व गुगल मॅपद्वारे ऑनलाइन दाखविली जाणार असल्याची माहिती मांगल्य सेवा समितीतर्फे देण्यात आली आहे.

दोनशे वर्षांची परंपरा खंडित

नंदुरबार शहरात गेल्या दोनशे वर्षांपासून होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी नंदुरबार शहरातील कमानी दरवाजा येथून जगदंबा देवीची मिरवणूक काढली जाते. शहरासह जिल्ह्यातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी होत असतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्यात आली होती. मात्र यंदा दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुखवटा दर्शन फेसबुक व गूगल मीटद्वारे ऑनलाइन पद्धतीने केले जाईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा प्रसिद्ध जगदंबा देवीची मिरवणूक खंडित झाली आहे.

सुवासिनी घेतात जगदंबा देवीचे दर्शन

दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी जगदंबा देवीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर सुवासिनी सहभागी होत असतात. यावेळी सुहासिनी जगदंबा देवीची ओटी भरून जगदंबा देवीचे दर्शन घेत असतात.

होळीला घेते जगदंबा देवी प्रदक्षिणा

रंगपंचमीच्या दिवशी जगदंबा देवीची मिरवणूक कमान दरवाजापासून सुरू होते बालाजी वाडा येथे मार्गस्थ होते व तेथून प्राचीन गणपती मंदिर येथे मिरवणूक समाप्ती होते या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक होळीला जगदंबा देवी प्रदक्षिणा घालते. त्यानंतर होळीचे पूजन करण्यात येते, अशी माहिती मांगले सेवा समितीतर्फे देण्यात आली.

Last Updated :Apr 2, 2021, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.