ETV Bharat / state

पंचायत राज समितीचा दौरा : नंदुरबार जिल्हा परिषद भ्रष्टाचाराची गंगोत्री; आमदार सदाभाऊ खोत

author img

By

Published : Oct 23, 2021, 12:07 PM IST

पंचायत राज समितीचा दौरा
पंचायत राज समितीचा दौरा

गेल्या पंधरा दिवसांपासून नंदुरबार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दौरा संबंधित तयारी सुरू होती. तीनदिवसीय दौऱ्यात पहिल्या दिवशी समितीने जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात विविध अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी समितीचे तीन विभागात विभाजन करून तीन पथक तयार करण्यात आले.

नंदुरबार - विधीमंडळ पंचायती राज समिती तीन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात पाहणी करून आढावा घेतला आहे. तीन विभागात पथक तयार करून सहा तालुक्यांना भेट दिली. भेटीदरम्यान काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या, त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना नोटिसा बजाविण्यात आल्या. तर काही ठिकाणी कामकाज पाहून समाधान व्यक्त केली. आज दौरा पुर्ण झाला असुन बऱ्याच विभागांमध्ये अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अनियमितता झाल्या असुन त्या रेकॉर्डवर घेवुन ज्यांनी चुकीचे काम केले असेल त्यांची गय केली जाणार नाही. अशी माहीती समितीचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर यांनी दिली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरच्या चौकश्यांचे अहवाल एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असुन काही प्रकरणांमध्ये सचिवांच्या देखील साक्ष होणार आहे, तर काही प्रकरणांमध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश समितीने दिले असल्याची माहीत त्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

नंदुरबार जिल्हा परिषद भ्रष्टाचाराची गंगोत्री; आमदार सदाभाऊ खोत

पंचायत राज समितीचा तीनदिवसीय दौरा

गेल्या पंधरा दिवसांपासून नंदुरबार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दौरा संबंधित तयारी सुरू होती. तीनदिवसीय दौऱ्यात पहिल्या दिवशी समितीने जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात विविध अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी समितीचे तीन विभागात विभाजन करून तीन पथक तयार करण्यात आले. यातील एक पथक नंदुरबार व नवापूर तालुक्यात दुसरे पथक अक्कलकुवा व स्थळ तालुक्यात तर तिसरे पथक शहादा धडगाव तालुक्यात रवाना झाले. समितीकडून जिल्ह्यातील सहाही तालुक्यात पाहणी करून त्रुटी आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून याबाबत आढावा घेतला.

समितीचे आंदोलन व पारंपारिक नृत्याने स्वागत

विधीमंडळ पंचायतीराज समितीचे आज जिल्हाभरात पाहणी दौऱ्यात कुठे आंदोलन तर कुठे पारंपारीक आदिवासी नृत्याच्या ठेक्यावर समितीचे स्वागत करण्यात आल्याचे चित्र दिसुन आले. विधिमंडळ पंचायत राज समितीच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी समितीने तीन पथकांद्वारे जिल्ह्यातील सहा तालुक्यांची पाहणी करत झाडाझडती घेतली. पंचायत राज समितीच्या शहादा धडगाव मधील आमदारांच्या पथकाचा पिंगाणे ग्रामस्थांनी शहादा विश्रामगृहाबाहेर ठिय्या देत रस्ता अडवला . या गावकऱ्यांच्या घरकुल आणि इतर समस्यां आंदोलन करुनही सुटत नसल्याने या गावातील शेकडो नागरीकांनी थेट समितीसमोर आंदोलन करत आपले गाऱ्हाणे मांडुन समितीला थेट पाहणीसाठी गावात नेले. यावेळी समितींनी गावातील समस्या जाणुन घेतल्या. तर नवापुर पथकांने देखील विविध ग्रामपंचायतींची झाडाझडती, आरोग्य केंद्रांची तपासणी करत नवापुर मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे पारंपारीक आदिवासी नृत्यांच्या तालावर स्वागत करण्यात आले.

विधीमडंळाच्या पटलावर समितीचा अहवाल ठेवल्याखेरीज बाहेर कुठलीही माहीती देता येत नाही. परंतु नंदुरबार जिल्हा परिषदही भष्ट्राचाराची गंगोत्री असल्याचे भाष्य आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य तेथे काही ठिकाणी वापर झाला नसल्याचे आढळून आले. पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण झाल्याच्या दाखविण्यात आल्या आहेत मात्र प्रत्यक्षात घेतल्या नाहीत, याबाबत प्रत्येक विभागाची खातेनिहाय चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात येईल व याबाबत विधिमंडळात आढावा घेतला जाईल असे देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.