ETV Bharat / state

आदिवासी पाड्यांमध्ये 'शिक्षण रथ'च्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश; शिक्षक दाम्पत्य बनले रथाचे सारथी

author img

By

Published : Oct 23, 2020, 9:15 AM IST

शिक्षक रथाच्या माध्यमातून शिक्षण
शिक्षक रथाच्या माध्यमातून शिक्षण

नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गंम अनेक पालकांकडे स्मार्ट मोबाइल नाही आणि असले तरी काही भागात नेटवर्क नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यावर उपाय म्हणून शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका शिक्षक दाम्पत्याने स्वखर्चातून शिक्षण रथ तयार केला आणि त्यामाध्यमातून घरोघरी ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम करित आहेत.

नंदुरबार - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व शाळा बंद आहेत. त्याला पर्याय म्हणून अ‍ॉनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे धोरण सरकारने सुरु केले आहे. मात्र, नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गंम अनेक पालकांकडे स्मार्ट मोबाइल नाही आणि असले तरी काही भागात नेटवर्क नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यावर उपाय म्हणून शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका शिक्षक दाम्पत्याने स्वखर्चातून शिक्षण रथ तयार केला आणि त्यामाध्यमातून घरोघरी ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम करित आहेत.

आदिवासी पाड्यांमध्ये शिक्षण रथाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश

सातपुड्याच्या या दुर्गंम भागात सर्वात कमी मानवविकास निर्देशांक आहे. तसेच भौगालिक परिस्थितीमुळे मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. अनेक कारणांनी ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत रविंद्र पाटील आणि प्रियंका पाटील हे शिक्षक दाम्पत्य आहे. या शिक्षक दाम्पत्याने विद्यार्थ्यांना दुर्गंम भागात शिक्षण मिळावे यासाठी स्व:ताच्या खर्चातून डिजिटल शिक्षण रथ बनवला आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. पाड्यावर जाऊन एका झाडाखाली ही शाळा भरत असते.

शिक्षक रथाच्या माध्यमातून शिक्षण
शिक्षक रथाच्या माध्यमातून शिक्षण

आमच्या परिस्थितीमुळे आम्ही शिक्षण घेऊ शकत नव्हतो. मात्र आमच्या गावात हे शिक्षक गाडी घेऊन येतात आणि आम्हाला शिक्षण घेता येत आहे. तर आमच्या पालकांकडे पैसे आणि मोबाईल नाही. त्यामुळे आम्हाला शिक्षण मिळत नव्हते. मात्र आता शिक्षण रथ येत असल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत नाही, असे दुर्गंम भागातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सुरु केलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. एकूणच दुर्गंम भागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनासाठी अशी युक्ती लढवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे हि अपेक्षा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.