ETV Bharat / state

तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; ऋषीपंचमीनिमित्त महिलांना नदीकाठावर जाण्यास मनाई

author img

By

Published : Aug 23, 2020, 1:05 PM IST

तापी नदी
तापी नदी

हवामान खात्याकडून पुढील 48 तासात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून 69 हजार 442 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

नंदुरबार - तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान, ऋषी पंचमीनिमित्त महिला तापी नदीवर अंघोळीसाठी जात असतात. मात्र, पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठावर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तापी नदीची पाणी पातळी

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 30 दरवाजे उघडले असून 10,1474 क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासोबतच हवामान खात्याकडून पुढील 48 तासात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून 69 हजार 442 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

हेही वाचा - मोठी बातमी..! एप्रिलमध्ये रंगणार आयपीएल २०२१चा हंगाम

यापार्श्वभूमीवर पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये, ऋषीपंचमी निमित्त महिलांनी तापी नदीकाठावर जावू नये, आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - राज्यातील कृषी खातं झोपलंय की काय? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.