ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये टाळेबंदी नाही, मात्र नियमांचे पालन करा - जिल्हाधिकारी

author img

By

Published : Feb 25, 2021, 4:59 AM IST

Updated : Feb 25, 2021, 6:30 AM IST

कारवाई करताना पोलीस
कारवाई करताना पोलीस

नंदुरबार जिल्ह्यात टाळेबंदी होणार नाही. मात्र, नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

नंदुरबार - इतर जिल्ह्याच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा जास्त वाढत नाही. यामुळे टाळेबंदी किंवा संचारबंदी करणार नाही. शासनाकडून देण्यात येणाऱ्या नियमांचे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

बोलताना जिल्हाधिकारी

नियम मोडाल तर..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेल्या नियमांचे पालन करा. गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गरज भासल्यास गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करू नये

जिल्ह्यात विवाह सोहळे, सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमात शासनाने दिलेल्या मर्यादेच्या आतच उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. विशेषत: कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या जिल्ह्यातून विवाहासाठी पाहुणे मंडळी येत असल्यास खबरदारी घ्यावी. सोहळ्याचा आनंद घेताना मास्कचा वापर होईल याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे. नियमांचे पालन न केल्यास आयोजक आणि लॉन्स किंवा मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

68 हजारांचा दंड वसूल

नियम मोडणाऱ्या 270 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन सुमारे 68 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा. अन्यथा कारवाई होणारच व या कारवाईला तुम्ही स्वतः जबाबदार असाल, असा इशारा जिल्हाधिकारी भारुड यांनी दिला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल स्वस्त, नागरिक गुजरातमध्ये जाऊन भरतात पेट्रोल

Last Updated :Feb 25, 2021, 6:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.