ETV Bharat / state

महाराष्ट्रात इंधन दरवाढ; स्वस्त पेट्रोलसाठी नागरिकांचा कल गुजरातकडे

author img

By

Published : May 31, 2021, 8:48 AM IST

Updated : May 31, 2021, 9:32 AM IST

Citizens flock to Gujarat for cheap petrol nandurbar news
स्वस्त पेट्रोलसाठी नागरिकांचा कल गुजरातकडे

राज्यासह जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभर रुपयांपेक्षा अधिक झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर डिझेल व गॅस असेदेखील दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहेत.

नंदुरबार - 'पेट्रोल महाराष्ट्र से दस रुपया सस्ता' कृपया अपनी गाडी की टंकी यहापर फुल करा लीजिये! गुजरात का आखरी पेट्रोल पंप है! अशी मोठी जाहिरात लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरात राज्यातील उच्छल येथील पेट्रोल पंप मालकाने ही जाहिरात केली आहे. पेट्रोल दर वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना महागाईच्या मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. पेट्रोल दरवाढीमुळे प्रत्येक गोष्टीचे दरवाढ झाल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव कमी व्हावेत, यासाठी नागरिकांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे कैफियत मांडली आहे.

ग्राहकाची प्रतिक्रिया

पेट्रोल गेली शंभरी पार -

राज्यासह जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभर रुपयांपेक्षा अधिक झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर डिझेल व गॅस असेदेखील दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहेत.

गुजरातमध्ये दहा रुपये स्वस्त पेट्रोल -

'पेट्रोल महाराष्ट्र से दस रुपया सस्ता' कृपया अपनी गाडी की टंकी यहापर फुल करा लीजिये! गुजरात का आखरी पेट्रोल पंप है! अशी मोठी जाहिरात लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरात राज्यातील उच्छल येथील पेट्रोल पंप मालकाने ही जाहिरात केली आहे. या पेट्रोल पंपवर 91.41 रुपये पेट्रोलचे दर आहे. येथून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल पंपावर 100.91 रुपये प्रतीलिटर पेट्रोलचे दर आहे.

हेही वाचा - एनसीबीने सुशांतच्या दोन नोकरांना चौकशीसाठी बोलाविले

नागरिकांची गुजरातला पसंती -

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या पेट्रोल दरात साडे नऊ रुपये फरक असल्याने महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोल पंपावर विक्रीत 20 टक्क्यांनी घट झाली आहे. तर गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर 9.50 रुपये दर कमी असल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार येथील वाहनचालक गुजरात मधील पेट्रोल खरेदीला पसंती देतात. महाराष्ट्रातील नागरिकांनी गुजरात राज्यातील पेट्रोल विकत घेण्यास पसंती दिली आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोलपंप मालकांना बसत आहे. देशभरात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत असताना जवळच्या गुजरात राज्यात पेट्रोल 9.50 रुपये स्वस्त मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पेट्रोलवर व‌ॅटदर गुजरात राज्यापेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्र व गुजरातमधील दरमध्ये तफावत का? -

महाराष्ट्रात पेट्रोलवर 26 टक्के तर गुजरात राज्यातील पेट्रोल वर 17 टक्के व्हॅट घेतला जातो. जवळपास साडे नऊ रुपये जास्त कर महाराष्ट्रात नागरिकांकडून आकारला जातो. महाराष्ट्र शासनाने टॅक्स दर कमी करून पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत. सध्या तरी सीमावर्ती भागातील नागरिकांनी गुजरात राज्यातील दहा रुपयांनी स्वस्त पेट्रोल भरण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - येत्या जूनमध्ये सीरम पुरवणार देशाला 9 ते 10 कोटी डोस

Last Updated :May 31, 2021, 9:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.