ETV Bharat / state

Nanded Crime : निवडणूक झाली, मिरवणुकीत तलवारी नाचवल्या; मतदान न केल्याने एकाला मारहाण

author img

By

Published : Jan 20, 2023, 7:22 PM IST

Nanded Crime
तलवार घेऊन नाचताना युवक

उपसरपंचपदाच्या निवडीनंतर आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली. 'आमचा नेता पॉवरफुल्ल' गाण्यावर थिरकताना प्रतिस्पर्ध्यांवर जरब बसावी यासाठी त्यांनी मिरवणुकीत तलवारी नाचवल्या. बरं प्रकरण एवढ्यावरही थांबले नाही तर गावगुंडांनी एकाला रक्त निघेपर्यंत मारहाणही केली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनूला या गावी घडली.

तलवार घेऊन नाचताना युवक

नांदेड : सरपंच पदासाठी आमच्या उमेदवाराला मतदान का केले नाही? असे म्हणत एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नूतन उपसरपंचांसह नऊ जणांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मिरवणुकीत विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी नाचवून अप्रत्यक्ष दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

हातात तलवारी घेऊन डान्स : उपसरपंचपदी विराजमान झाल्यावर मिरवणूक काढण्याकरिता संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी जाळावर तलवारींच्या पाती गरम करुन त्या नाचवण्यास तरुणांनी मागे पुढे पाहिले नाही. हा सगळा प्रकार सुमारे २० मिनिटे सुरू होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद आणि वादावादी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. कुठे दोन पॅनल तर कुठे तीन पॅनलमध्ये लढती झाल्या. मात्र, निवडणुकीतील खुन्नस आता काढली जात आहे. हदगाव तालुक्यातील मनूला या गावात असाच प्रकार घडला आहे.

युवकावर तलवारीने हल्ला : उपसरपंच पदाच्या निवडीनंतर डीजे लावून गावात मिरवणूक काढण्यात आली. याच तलवारीने एका युवकावर वार केला. सरपंच पदाच्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराला का मतदान केले नाही, असे म्हणत वाद घालून वार करण्यात आला.

नांदेडमधील गुन्हेगारी शिगेला : दोन भावांना अडकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तीने स्वत:वर गोळीबार करुन घेतल्याचे 12 जानेवारी, 2023 रोजी उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्तीसह तिच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सविता गायकवाड असे त्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्तीचे नाव आहे. त्यामुळे तक्रारदार असलेली काँग्रेस कार्यकर्तीच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजता नांदेड येथील ओव्हरब्रीजवर घडली होती.

आयशर चोरी प्रकरणात गुन्हा दाखल : काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड आणि आतिक खान यांच्या विरोधात सहा महिन्यांपूर्वी भोकर पोलीस ठाण्यात आयशर चोरी प्रकरणात गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात परभणी येथील रहीम खान हे साक्षीदार होते. या घटनेचा राग मनात धरून ६ जानेवारीला सविता गायकवाड आणि फैसल हे खासगी वाहनाने रात्री परभणीला गेले. तिथे रहीम खान आणि सविता गायकवाड यांच्यात वाद झाला. त्यानंतर रहीम खान यांनी परभणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सविता गायकवाड विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या गुन्ह्याबद्दल धडा शिकवण्यासाठी खोट्या गुन्ह्याचा कट रचण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत रहीम खान आणि त्याच्या भावाला अडकवण्याचा सविता गायकवाडने चंग बांधला होता. नांदेड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास पुरेसे आहे.

हेही वाचा : Narayan Chandel Son : छत्तीसगडचे विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.