ETV Bharat / state

दागिन्यांची बॅग चोरी प्रकरणात ओडिसातून चोरट्याला मुद्देमालासह अटक, नांदेड पोलिसांनी 'अशी' केली दमदार कामगिरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 10:59 AM IST

Police arrested an accused from Odisha in case of bag lifting
सिडको परिसरातील बॅग लिफ्टिंगचा पोलिसांनी लावला छडा; ओडिसातून चोरट्याला मुद्देमालासह अटक

Nanded Bag Lifting Case : सिडको येथील बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी ओडिसा येथील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 23 हजाराचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दीपक इसफूल प्रधान असं आरोपीचं नाव आहे.

सिडको परिसरातील बॅग लिफ्टिंगचा पोलिसांनी लावला छडा

नांदेड Nanded Bag Lifting Case : सिडको भागात 24 नोव्हेंबर रोजी बॅग लिफ्टिंगची घटना घडली होती. दुकान उघडत असताना एका सराफा व्यापाऱ्या जवळील सोनं-चांदी असलेली बॅग चोरट्यानी लंपास केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची माहिती मिळवली. तसंच करण्यात आलेल्या तपासातून आरोपी ओडिसातील असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी ओडिसात जाऊन आरोपी दिपक प्रधानला ( वय 21) अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना दिली.


दोन ठिकाणी घडल्या सारख्याच घटना : परराज्यातील आरोपी काही दिवस नांदेड येथील एका लॉजमध्ये वास्तव्यास होता. त्यानंतर त्यानं दत्तनगर भागात रुम घेतली. 24 नोव्हेंबर रोजी सिडको येथील सराफा व्यापारी चंद्रकांत डहाळे हे सकाळी आपले 'तुळजाई ज्वेलर्स' उघडत असताना त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग काही क्षणात चोरी झाल्याची घटना घडली होती. याच महिन्यात अर्धापूरच्या पोलीस स्थानकातही सराफा व्यापाऱ्याची बॅग पळविलेली घटना घडली होती. त्यानंतर नांदेड ग्रामीण व अर्धापूर या दोन्ही पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते.

तपास सुरू : या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक रवी वाहुळे व पोलीस कर्मचाऱ्यांचे एक स्वतंत्र पथक या गुन्ह्यातील तपासासाठी आणि आरोपीच्या अटकेसाठी सक्रिय होते. अर्धापूर अन् नांदेड ग्रामीण येथील घडलेले गुन्हे एक सारखेचं तपासात आढळून आले. या गुन्ह्यातील आरोपी ओडिसा राज्यातील असल्याचा पोलिसांचा अंदाज होता.

अखेर आरोपीला अटक : आरोपीच्या शोधासाठी तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यात पोलिसांचे पथक गेले होते. ओडिसामध्ये आरोपी दीपक इसफुल प्रधान याच्या गावात पोलिसांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी माधव केंद्रे जखमी झाले होते. अखेर सापळा रचत आरोपीला पकडण्यात आलं. दरम्यान, दीपक प्रधानसह असलेल्या अन्य आरोपींची माहिती आणि त्यांची नावं निष्पन्न झाली असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News : विमानतळावर घडला धक्कादायक प्रकार, दोन कर्मचाऱ्यांना बॅग लुटल्याप्रकरणी अटक
  2. औरंगाबाद : गोळ्या-बिस्कीट व्यापाऱ्यांची पावणेचार लाखाची बॅग लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद
  3. Jewellery Bag Thief Arrest Mumbai : घरात घुसून सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरी करून फरार होणाऱ्या महिलेस अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.