ETV Bharat / state

नांदेड जिल्हा भाजप पक्षाला नांदवणार का? अमित शहांची सभा मतदारांनाआकर्षित करणार?

author img

By

Published : Jun 10, 2023, 5:11 PM IST

Updated : Jun 11, 2023, 2:28 PM IST

Etv Bharatनांदेड जिल्ह्याचे राजकारणासाठी महत्त्वाचे
नांदेड जिल्ह्याचे राजकारणासाठी महत्त्वाचे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नांदेड शहरात त्यांची सभा होत आहे. नांदेड शहरातील बाफना चौकाजवळील अफजल नगर येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजकीयदृष्ट्या नांदेड जिल्ह्याचे काय आहे वैशिष्ट्य. जिल्ह्यात राजकीय परिस्थिती काय आहे याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नांदेड शहरात त्यांची सभा होणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात नांदेड जिल्ह्याला राजकीयदृष्ट्या खूप महत्व आले आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी नांदेडला सभा घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नांदेडचा दौरा केला. आता भाजप नेते अमित शाह सभा घेणार आहेत. त्यामुळे राजकारणात नांदेड का महत्त्वाचे आहे हे आपण समजून घेणार आहोत.

ऐतिहासिक वारसा : महाराष्ट्राच्या एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी १६ क्रमांकावर नांदेड लोकसभा मतदार संघ आहे. मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. नांदेडमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे असून याला प्राचीन इतिहास लाभला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या नांदेड शहराला यापूर्वी रामायण काळातले नंदीग्राम असे संबोधले जायचे. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रसिद्ध असलेल्या रेणूका देवीचे मंदिर आहे. तसेच नांदेडमध्ये प्रसिद्ध गुरु गोविंदसिंह यांचे वास्तव्य आणि समाधी असल्याने या जिल्ह्याचे महत्त्व फार वाढले आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 10 हजार 502 चौरस किमी आहे. नांदेड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 33 लाख 56 हजार 566 इतकी आहे. याच नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते.

नांदेड जिल्हा
नांदेड जिल्हा

मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा : मराठवाडा विभागात मोडणारा नांदेड हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आहे. मागच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 4 लाख 86 हजार 806 तर काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 मते मिळाली होती.

नांदेड जिल्हा
नांदेड जिल्हा

भाजपमध्ये गटबाजी : नांदेडमध्ये सध्या भाजपला गटबाजीने पोखरले आहे. नांदेडमध्ये भाजपचे ४ आमदार आणि १ खासदार आहे. मात्र खासदार सोडून अन्य तिन्ही आमदार पक्षवाढीच्या कामात कधीही अग्रेसर होताना दिसले नाहीत. किनवटचे आमदार भिमराव केराम मध्यंतरी दोन वर्षे आजारी असल्याने ते किनवट सोडून कधीच बाहेर आलेच नाहीत. दुसरीकडे मुखेडचे तुषार राठोड यांचा थाटच वेगळा आहे. नायगावचे आमदार राजेश पवार यांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांची माहिती माहित आहेत की नाही, याचीही शंका येते. याचे कारण राजेश पवार हे जास्त करून मुंबई-पुण्यातच वास्तव्यास असतात. तर फक्त दैव बलवत्तर म्हणून विधान परिषदेची संधी मिळालेले राम पाटील यांनी त्यांचे गाव रातोळी सोडले तर कुठेच प्रभाव पाडू शकलेले नाही आहेत. या चारही आमदारांचे तसे पक्ष वाढीसाठी काही योगदान दिसत नसल्याने केवळ खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे एकटेच संपूर्ण जिल्ह्याचा भार खांद्यावर घेऊन भाजपकडून एकटेच लढत आहेत असे सध्या चित्र आहे.

हेही वाचा -

  1. Amit Shah in Nanded : अमित शाह यांची आज अशोकराव चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात सभा, भाजप करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
  2. Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत
Last Updated :Jun 11, 2023, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.