ETV Bharat / state

Ganesh Festival 2023: पाळज येथील गणपतीला पाच राज्यातील भाविकांची मोठी गर्दी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 10:37 PM IST

Ganesh Festival 2023
पाळज गणपती

Ganesh Festival 2023: नांदेड जिल्ह्यातील पाळज येथील गणपती (Palaj Ganapati) स्थापनेला तब्बल 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. (Palaj Ganpati Darshan) या गणपती दर्शनाला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान (Palaj in Bhokar Taluka) येथून दर्शनाला भाविक येत आहेत. सध्या दर्शनाच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. पाच तास दर्शनाला लागत असल्याची माहिती मंदिर समितीनं दिली आहे.

पाळजच्या गणरायांविषयी माहिती देताना भाविक

नांदेड Ganesh Festival 2023: भोकर तालुक्यातील पाळज (Palaj Ganapati) हे गाव तेलंगणाच्या सीमेलगत आहे. या गावातील गणपतीची स्थापना १९४८ ला करण्यात आली. (Palaj Ganpati Darshan) तेलंगणा राज्यातील निर्मल येथून एका कारागिराकडून लाकडी मूर्ती बनवून आणली होती. (Palaj in Bhokar Taluka) गणेशोत्सव काळात पाळज येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पाच राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान अशी या गणेशाची ओळख आहे.

अकरा दिवसात साथीच्या रोगावर नियंत्रण: १९४८ ला गावात प्लेग, गॅस्ट्रो असे साथीचे रोग पसरले होते. तेव्हा गणपती उत्सवात ही मूर्ती स्थापन करण्यात आली होती. तेव्हा अकरा दिवसात साथीच्या रोगावर नियंत्रण आलं होतं, असं सांगण्यात येतं. त्यानंतर गावकऱ्यांनी असे ठरविलं की, या मूर्तीचं विसर्जन न करता दरवर्षी गणपती उत्सवाच्या काळात अकरा दिवस या मूर्तीची पूजा करायची. या मूर्तीचं विसर्जन करायचे नाही, असे गावकऱ्यांच्या वतीनं ठरविण्यात आलं. तेव्हापासून आजपर्यंत गणेश उत्सवाच्या काळात या सुंदर लाकडी मूर्तीची ११ दिवस पूजा केली जाते. त्यासमोर एक दुसरी गणपतीची मूर्ती ठेवण्यात येते. त्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येते. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही हा गणपती ओळखला जातो.

दर्शनासाठी भाविकांची होते गर्दी: भोकर तालुक्यातील पाळज येथील गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख आहे. दर्शनासाठी आलेले अनेक गणेशभक्तांच्या मनोकामना येथे पूर्ण झाल्या असून, भक्तांचं श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ओळख आहे. गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक , गुजरात , राज्यस्थान येथील भाविक दर्शनासाठी भक्त गणेशोत्सव काळात येतात. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवाला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथे आलेले भाविक नवसाचं नारळ कपड्यामध्ये बांधून मंदिर समितीकडे देतात. नवस पूर्ण झाल्यावर ते कापड सोडून नवस पूर्ण झाल्याचं सांगत मन:पूर्वक दर्शन घेतात, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

मंदिरातर्फे ५० क्विंटलचा दररोज होतो महाप्रसाद: गणेशोत्सव काळात महाप्रसादाचं वाटप केलं जातं. सुमारे ५० ते ७० क्विंटलपर्यंत महाप्रसाद भाविकांसाठी बनविला जातो. त्याचप्रमाणे येथे पेंडॉल व शुद्ध पाण्याची सुविधाही केली आहे. गणेशोत्सव काळात सकाळी ६:३० व सायंकाळी ६:३० या अशी दोन वेळा आरती केली जाते. तसेच 24 तास प्रसाद लड्डू बनवले जातात. गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं मोफत श्रमदान करतात. विशेष म्हणजे, पाळज येथील ग्रामस्थ गणपती काळात आपल्या नोकरी तथा व्यवसाय बंद करून आपले योगदान देतात.

हेही वाचा:

  1. Goldan Modak In Nashik : नाशकात बाप्पांच्या नैवेद्यासाठी 16 हजार रुपये किलोचे गोल्डन मोदक
  2. Ganesh Festival 2023 : मुख्यमंत्र्यांच्या घरच्या दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन, पत्नीने वाजवला ढोल; पहा व्हिडिओ
  3. Ganesh Festival 2023: लालबागमधील पर्यावरणाचा राजा पाहण्यासाठी भाविकांच्या लागल्या रांगा, पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.