ETV Bharat / state

Average Rainfall in Nanded : नांदेड जिल्ह्यात सरासरी 24 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस ; हिमायतनगरमध्ये 155 तर धर्माबादमध्ये 171 टक्के पाऊस

author img

By

Published : Oct 14, 2022, 12:50 PM IST

Average Rainfall in Nanded
नांदेडमध्ये सरासरी पाऊस

नांदेड जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात धर्माबाद तालुक्यात १७१ टक्के (171 percent rainfall in Dharmabad ) तर हिमायतनगर तालुक्यात १५५ टक्के अधिक पाऊस झाला (155 percent rainfall in Himayatnagar ) आहे. जिल्ह्याने देखील वार्षिक सरासरी ओलांडली (average rainfall Nanded 24 percent higher) आहे.

नांदेड : यावर्षीच्या पावसाळ्यात धर्माबाद तालुक्यात १७१ टक्के (171 percent rainfall in Dharmabad) तर हिमायतनगर तालुक्यात १५५ टक्के अधिक पाऊस झाला (155 percent rainfall in Himayatnagar) आहे. जिल्ह्याने देखील वार्षिक सरासरी ओलांडली आहे. २४ टक्के जास्तीचा पाऊस झाल्याने खरिपातील पिकांच्या नुकसानीचा आकडा वाढला Average Rainfall in Nanded आहे.

वार्षिक सरासरी ओलांडली : दरवर्षीच्या पावसाळी हंगामात १ जून ते ३१ ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात सरासरी ८९१ मिमी पाऊस होतो. यावर्षी १०९५ मिमी पाऊस झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात काही मंडळांत तीन वेळेस तर काही मंडळांत आठ वेळेस अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढत गेली. ऑगस्ट महिन्यातच सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी धर्माबाद तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा ७४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर हिमायतनगर तालुक्यात ५५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १६ तालुके असून, या सर्वच तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली (average rainfall Nanded 24 percent higher) आहे.


सर्वात कमी पाऊस ११० टक्के : जिल्ह्यात हदगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ११० टक्के पाऊस झाला आहे. देगलूर तालुक्यात ११२ टक्के, कंधार तालुक्यात ११७ टक्के, बिलोली तालुक्यात ११८ टक्के तर लोहा व माहूर तालुक्यांत १२० टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असून अतिवृष्टीने नुकसान (average rainfall) आहे .तालुका निहाय टक्केवारी : नांदेड १३३, मुखेड १२८, कंधार ११७, भोकर १२७, किनवट १३१, मुदखेड १४७, हि.नगर १५५, धर्माबाद १७१, उमरी १४६, अर्धापूर १३१, नायगाव १३४, एकूण १२८ टक्के.



परतीचा पाऊस सोयाबीनच्या मुळावर : आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. ११ जिल्ह्यात अनेक भागात अजूनही पाऊस होतच आहे. जुलै, ऑगस्टमधील पावसाने वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरीप पिकांचे नुकसान केले. काढणीस आलेले सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटत आहे. आता परतीचा पाऊस काढणीला आलेल्या सोयाबीनच्या मुळावर उठला आहे. नुकसान सुरूच असल्याने जिल्ह्यातला बळीराजा हतबल झाला आहे. परतीचा पाऊस सुरु असल्याने काढणीच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत. काढणी झाली नसल्याने सोयाबिनचा उतारा घटण्याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात (rainfall in Nanded district) आहे.



ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.