ETV Bharat / state

नांदेड महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

author img

By

Published : Sep 3, 2021, 3:33 AM IST

नांदेड महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी तथा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

nanded latest news
nanded latest news

नांदेड : महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. नांदेड महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी तथा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी आणि पदोन्नतीचा गुंता आठ वर्षांपासून कायम आहे. कनिष्ट कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कर्मचाऱ्याची कामे लादली जात आहेत, असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया

शुक्रवारी करणार निदर्शने -

महानगरपालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने बुधवारी पालिकेसमोर आंदोलन सुरु केले. पालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, सहा टक्के थकीत महागाई भत्ता तत्काळ अदा करावा, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवा प्रवेश नियम व आकृतीबंधाचा प्रस्ताव पारदर्शक करावा, कंत्राटी कामगारांचे किमान वेतनातील फरकाची रक्कम द्यावी, आदी मागण्या कर्मचारी युनियनच्यावतीने करण्यात आल्या. तसेच यामागण्यासाठी शुक्रवारी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती ही या कर्मचाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती खासदार संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सर्व पक्षांचे प्रतिनिधी होते उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.