ETV Bharat / state

Two Murders In Nagpur : नागपुरात दोघांची हत्या, प्रॉपर्टी डीलरच्या डोक्यात झाडली गोळी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 10:42 PM IST

Two Murders In Nagpur : राज्याच्या उपराजधानीत नागपुरात दोन जणांचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकणी तीन जणांना ताब्यात घेतलं असून एका आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केलाय.

Two Murders In Nagpur
Two Murders In Nagpur

विनोद पाटील घटनेची माहिती देताना

नागपूर Two Murders In Nagpur : चोवीस तासांत दोन हत्यांनी नागपूर हादरले. एका प्रॉपर्टी डीलरची त्याच्या गेस्टहाऊसमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. तर, दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनांमुळे नागपुरातील कायदा, सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं दिसून येत आहे.

पहिली घटना : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शितला माता चौक परिसरात हा प्रकार घडला. आरोपी पतीनं पत्नीची हत्या केली आहे. आरोपीनं तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळ्यावर लोखंडी पाईपनं वार केले. त्यामुळं पत्नीचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी आहे. पत्नीची हत्या करून आरोपी फरार झाला असून सक्करदरा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

प्रॉपर्टी डीलरची हत्या : दुसरी घटना तहसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत जमील अहमद यांचं गेस्ट हाऊस तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. मृतक हे प्रॉपर्टी डीलिंगचं काम करायचे. मोहम्मद परवेझ मोहम्मद हारून याच्याशी त्यांची गेल्या सहा वर्षांपासून ओळख होती. दोघेही मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करायचे. बुधवारी दुपारी रात्री दीडच्या सुमारास जमील अहमद गेस्ट हाऊसमध्ये काम करणारा अब्दुल माजीद अख्तर गेस्टहाऊसच्या रिसेप्शनवर काम करत होते. त्याचवेळी आरोपी मोहम्मद परवेज त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. त्यानंतर जमीलसोबत मालमत्तेच्या मुद्द्यावरून वाद घालू लागला. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन आरोपीनं खिशातून पिस्तूल काढून जमीलवर गोळी झाडली. जमीलच्या डोक्यात गोळी लागल्यानं जमीलचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी गेस्ट हाऊसमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. जमीलची पत्नी नाहिदा परवीन जमील अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना चंद्रपूर येथून अटक : आरोपींनी प्रॉपर्टी डीलर जमील अहमद यांची हत्या केल्यानंतर पळ काढला होता. पोलिसांचे पथक त्यांच्या मार्गावर होतं. त्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना चंद्रपूर येथून ताब्यात घेतलं आहे.


हेही वाचा -

  1. Lalit Patil Case Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; 'या' कारणामुळे पोलीस करणार माजी महापौरांची चौकशी...
  2. Youth Killed By Tractor : जमिनीच्या वादातून ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या, मरेपर्यंत सहा वेळा अंगावरून ट्रॅक्टर चालवला
  3. Raid On Drug Factory: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना; मिरा भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.