ETV Bharat / state

ट्रक चालक संप : 'गरज भासल्यास पेट्रोल पंपला पोलीस संरक्षण दिलं जाईल'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 5:46 PM IST

Hit And Run Law Truck Driver Strike : देशभरात ट्रक चालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारलं. 'हिट अँड रण' कायद्यात केंद्र सरकारनं काही कठोर तरतुदी केल्या आहेत. त्या विरोधात सर्वत्र ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट आहे. नागपुरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनासोबत पोलीस प्रशासनही ऍक्टिव्ह मोडवर आले आहे.

Petrol Pump
पेट्रोल पंप

प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार

नागपूर Hit And Run Law Truck Driver Strike : केंद्र सरकारच्या 'हिट अँड रण' कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालक असोसिएशन अंतर्गत येणारे चालक कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याने अराजकता निर्माण होईल अशी, भीती व्यक्त होतेय. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

आंदोलनकर्त्यांनी ही काळजी घ्यावी : शहरात इंधन आणि आवश्यक सुविधांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती, शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिलीय. आंदोलनकर्त्यांनी शंतातेत आंदोलन करावे. पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका, अत्यावश्यक सेवेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी आंदोलनकर्त्यांनी घ्यावी असंही आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय. सगळ्याचं पेट्रोल पंपला पोलीस सुरक्षा देणं शक्य नाही मात्र, जिथं आवश्यक आहे तिथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात येईल असंही ते म्हणालेत.

पुणे शहरासह सर्वत्र नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलाय. सरकारनं या कायद्यात दुरुस्ती करावी, अशी ट्रक चालकांची मागणी आहे. अन्यथा सलग तीन दिवस संप सुरू असेल, असा इशारा ट्रक चालकांच्या संघटनांनी दिलाय. त्याच्या परिणामी इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातं असतानाच सोमवारी (1 जानेवारी) रात्री पुढील तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहतील, अशी अफवा पसरली. त्यामुळं रात्री पुणे शहरासह सर्वत्र नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर या संपाचा पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी स्पष्ट केलं. मात्र, तरीदेखील पुण्यातील विविध पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी केली आहे.

हेही वाचा -

  1. काय आहे हिट अँड रन कायदा? ट्रक चालक का झालेयत आक्रमक; वाचा सविस्तर
  2. सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये-राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन
  3. Pune Accident News : पुण्यात हिट अ‍ॅंड रन! पीएमपीएल बस चालकानं दारुच्या नशेत दहा ते पंधरा गाड्यांना उडवलं, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.