ETV Bharat / state

सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये-राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 8:07 AM IST

Updated : Jan 2, 2024, 1:49 PM IST

केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात राज्यभरात धावणाऱ्या दोन हजारांहून अधिक टँकर, ट्रक चालकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. नव्या कायद्याला मालट्रक, टँकर चालक-मालक संघटनेनं विरोध दर्शवला आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.

petrol diesel truck drivers strike
petrol diesel truck drivers strike

मुंबई - अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास १० वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद नव्या कायद्यात केली आहे. हा कायदा अतिकठोर आणि अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करत वाहन चालक, मालक संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे सोमवारी दिसून आले.

Live Updates

  • विविध टॅक्सी संघटना आणि ट्रक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये आमच्याशी चर्चा करावी. आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. पण सरकार हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन दिल्लीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
    • वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारने रद्द करावा.
      नवीन कायद्यानुसार अपघात झाल्यास वाहन चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

      जनविरोधी काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचे काम केंद्र सरकार करत…

      — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 2, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • केंद्र सरकारनं वाहन चालकांच्या बाबतीत नवा कायदा केला असून या कायद्याच्या विरोधात ट्रक चालक हे आक्रमक झाले आहेत. हा काळा कायदा असून हा कायदा जोपर्यंत परत घेत नाही, तोपर्यंत आम्ही गाड्या सुरू करणार नसल्याची आक्रमक भूमिका ट्रक चालकांनी घेतली आहे.
  • केंद्र सरकारनं वाहन चालकाच्या बाबतीत नवा कायदा केला आहे. या कायद्याच्या विरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका पुण्यातील मार्केट यार्ड येथे बसला आहे. आज मार्केटयार्ड येथे आवक कमी झाली आहे. टँकर चालकांच्या संपाचा 10 टक्के फटका बसला असल्याचं मार्केट यार्डचे अध्यक्ष बापू भोसले यांनी सांगितलं आहे.

टँकर चालकांचे राज्यभरात संप सुरू असून या संपाचा परिणाम जळगाव जिल्ह्यात झाल्याचा पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चेमुळे मध्यरात्री जळगावातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तुफान गर्दी झाली होती. या सर्व वाहनचालकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केल्यामुळे दुसऱ्या दिवशी या पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला आहे. या ठिकाणी पेट्रोल शिल्लक नसल्याचे बोर्ड लावण्यात आला आहे.

  • वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. जनविरोधी काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस असे समाजातील सर्व घटक सातत्यानं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असल्याची टीका विरोधी पक्षनेत्यांनी मोदी सरकारवर केली.
  • पेट्रोल पंप इंधनाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारल्यानं स्कूल बस असोसिएशन संघटनेनं आज संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलाविली आहे. या बैठकीत स्कूल बस सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
  • पुण्यातील लोणी काळभोर येथील पेट्रोल डिझेल टर्मिनलमधून वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे शहर ,पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड शहर सातारा, अहमदनगर आणि इतर ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर वाहतुक सुरळितपणं सुरू आहे. वाहतूकदार संपाचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. पेट्रोल- डिझेल भरून टँकर इंधन डेपोमधून बाहेर पडत आहेत.
  • हिट अँड रन रोड अपघाताच्या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी सोमवारी राज्यभरात विविध ठिकाणी 'रास्ता रोको' करत निदर्शने केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणाऱ्या ट्रक चालक व टँकर चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे राज्यातील काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्याचं पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

नवी मुंबई आणि ठाण्यात हिंसक वळण- नवीन मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं. ट्रक चालकांच्या जमावानं केलेल्या हल्ल्यात नवी मुंबईतील नेरूळमध्ये एक पोलीस जखमी झाला. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर परिसरात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकचालकांनी काही काळ वाहतूक रोखून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी पोलीस कर्मचारी जखमी झाला असून दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले. सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

  • उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात टँकर चालकांनी कामबंद आंदोलन केल्यानं इंधन वाहतुकीला मोठा फटका बसला. इंधन डेपो असलेल्या पानेवाडी गावात 1,000 हून अधिक वाहने उभी होती.
  • नांदगाव तालुक्यातील पानेवाडी गावात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल आणि एलपीजी भरण्याचे केंद्र आहे. याच डेपोतून इंधनाची वाहतूक राज्याच्या विविध भागात केली जाते.
  • नाशिक जिल्ह्यात एकाही टँकरला इंधन वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले.

नवीन कायद्यातील तरतूद अन्यायकारक- आंदोलक टँकर चालकांपैकी सय्यद वाजेद म्हणाले, नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 7 लाख रुपयांचा दंड होणार आहे. आम्ही चालक असताना एवढी मोठी दंडाची रक्कम कसे देणार? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हिट अँड रन कायद्यातील नवीन तरतुदीवर टीका केली. नाना पटोले मुंबईत माध्मयांशी बोलताना म्हणाले की, नवीन कायद्यातील तरतूद अन्यायकारक आहे. त्या तरतुदीमुळे दुचाकीस्वारही वाहन चालविण्यास घाबरतात.

इंधनाचा तुटवडा पडू शकतो- मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंप डीलर्सच्या संघटनेच्े सचिव अकील अब्बास यांनी सांगितलं की, परिस्थिती सामान्य न झाल्यास जिल्ह्यातील पेट्रोल पंपामध्ये इंधनाचा तुटवडा पडू शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुमारे 900 ते 1,200 टँकर इंधन घेऊन वाहतूक करतात. हे काम ठप्प झाल्याचं पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी सांगितलं.

हेही वाचा-ट्रक चालकांचा संप : पेट्रोल पंप राहणार सुरू, पोलीस संरक्षणात पेट्रोल डिझेलचा करणार पुरवठा

Last Updated : Jan 2, 2024, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.