ETV Bharat / state

Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान यांची हत्या; एकाला अटक, जबलपूरमध्ये मृतदेहाचा शोध सुरू

author img

By

Published : Aug 11, 2023, 7:35 PM IST

Updated : Aug 11, 2023, 10:45 PM IST

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांची हत्या (Murder of BJP leader Sana Khan ) करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू यानेच तिच्या हत्येची कबुली दिला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

नागपूर पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांची हत्या (Murder of BJP leader Sana Khan ) करण्यात आली आहे. सना हत्याकांडातील मुख्य आरोपी अमित साहूनेच (Accused in Sana massacre Amit Sahu) याची कबुली पोलिसांनी दिल्याचे वृत्त आहे. सना खान बेपत्ता झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अमित साहूला अटक (Sana massacre accused Amit Sahu arrested) करण्यात आली आहे. याशिवाय अन्य दोन जणांना ताब्यात घेतल आहे.

मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली : सना खान यांची हत्या करून त्यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी जबलपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. भाजप नेत्या सना खान 2 ऑगस्ट रोजी जबलपूरमध्ये त्यांचा मित्र अमित उर्फ ​​पप्पू साहूला भेटायला गेल्या होत्या. तो त्यांचा बिझनेस पार्टनरही होता. त्या अमितच्या घरी राहत होत्या. अमितचा ढाबाही तिथेच आहे. सना खान जबलपूरला गेल्या असताना त्यांचे अमित साहू सोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अमित साहूने सना खानच्या डोक्यावर वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह हिरन नदीत फेकून दिली अशी प्राथमिक आरोपीने पोलिसांना दिली आहे.

सना खान 2 ऑगस्टपासून बेपत्ता : पोलिसांच्या माहितीनुसार 2 ऑगस्टच्या दुपारपासून सना खान बेपत्ता होत्या. त्यांना जबलपूर येथील एकाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. जबलपुरला गेल्याच्या दोन दिवसानंतर त्यांचा संपर्क होत नसल्याने सना खानच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मानकापूर पोलिसांचे पथक तपासासाठी जबलपूरला जाताच अमित साहू फरार झाला होता. त्याचा नोकरही तेथून पळून गेला होता. अखेर पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौर याला अटक केली.

मृतदेह अद्याप गायब : सना खानची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले झाले आहे. मात्र अद्याप मृतदेह सापडलेला नाही आरोपींनी सना खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह हा हिरण नदीत फेकून दिला असून मृतदेहाचा शोध घेण्याकरिता स्थानिक गोताखोरांची मदत घेतली जात असल्याची माहिती डीसीपी मदने यांनी दिली आहे. हत्येनंतर सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याचेही जितेंद्र गौरने पोलिसांना सांगितले आहे. सना खान हत्येचा गुन्हा जबलपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून त्यातील एक आरोपी जितेंद्रलाही गोराबाजार-जबलपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जबलपूर पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

जबलपूर पोलिसांनी फार सहकार्य केले नाही : सना खान बेपत्ता असल्याची फिर्याद तीन ऑगस्ट रोजी मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर पोलिसांच्या संपर्कात होते. मात्र, या प्रकरणात जबलपूर पोलिसांनी पाहिजेत तसे सहकार्य न केल्याचा आरोप नागपूरचे पोलीस आयुक्त राहुल मदने यांनी केला आहे. त्यामुळे मानकापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सना उर्फ ​​हिना खानची हत्या करून तिचा मृतदेह आरोपी अमित साहूने हिरण नदीत फेकून दिला आहे. आरोपीला गोरा बाजारजवळून अटक केली आहे. त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन क्राईम सीन पुन्हा क्रिएट केला जात आहे. अमित साहूने सांगितले की, सनासोबत वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात सनाला मारहाण केली आणि तिचा मृतदेह गाडीत भरुन तो हिरण नदीत पुलावरून फेकून दिला होता - अतिरिक्त एसपी कमल मौर्य, जबलपूर

मृतदेहाचा शोध सुरू - जबलपूर पोलीस आणि नागपूर पोलिसांचे पथक मिळून सना खानच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. अमित साहू याने ज्या नदीत सना खानचा मृतदेह फेकला होता, त्या हिरण नदीला 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत सातत्याने पूर येत होता. त्यामुळे नदीची पाणीपातळीत वाढ झाली होती. तसेच ही नदी पुढे १० किलोमीटरवर नर्मदा नदीला मिळते. त्यामुले मृतदेह सापडण्यास अडचणी येत असल्याची माहिजी जबलपूर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Sana Khan Missing case : बहिणीच्या शोधात सना खानचा भाऊ जबलपुरात, खुनाचा संशय
  2. Sana Khan Missing Case : सना खान बेपत्ता प्रकरणाचे गुढ वाढले.. गुंड पप्पू साहूबरोबरील लग्नाचे कागदपत्रे आले समोर
  3. BJP Sana Khan Missing : बेपत्ता भाजपा नेत्या सना खानसोबत घातपात? वाचा पोलीस काय म्हणाले...
Last Updated :Aug 11, 2023, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.