ETV Bharat / state

BJP Sana Khan Missing : बेपत्ता भाजपा नेत्या सना खानसोबत घातपात? वाचा पोलीस काय म्हणाले...

author img

By

Published : Aug 8, 2023, 4:41 PM IST

Updated : Aug 8, 2023, 5:45 PM IST

नागपुरातील भाजपच्या महिला नेत्या सना खान १ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. सना खान मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या, त्यानंतर त्या परतल्याच नाहीत. त्यांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

BJP Sana Khan Missin
बेपत्ता भाजप नेत्या सना खान

माहिती देताना पोलीस उपायुक्त राहुल मदने

नागपूर : नागपूर शहर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक महिला नेत्या सना खान गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहेत. सना खान यांच्यासोबत घातपात झाला अशी चर्चा नागपूरमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले आहे. शहरातील मानकापूर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशच्या जबलपूरला रवाना झाले आहे.


पोलिसांचे एक पथक जबलपूरकडे रवाना : पश्चिम नागपूरच्या महिला भाजपच्य नेत्या सना खान यांना शोधण्यासाठी मानकापूर पोलीस प्रयत्न करत असताना, त्यांचा शोध हा मध्यप्रदेशच्या जबलपूर शहराच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे मानकापूर पोलिसांचे एक पथक जबलपूरकडे रवाना झाले आहे. जबलपूर येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचा तपास अद्याप नागपूर पोलिसांनी केलेली नाही. यासंदर्भात झोन दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी देखील हे वृत्त सध्या निराधार आल्याचे म्हटले आहे.



असा आहे बेपत्ता होण्याचा घटनाक्रम : पोलिसांच्या माहितीनुसार, सना खान १ ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. त्यांना जबलपूर येथील एकाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. जबलपूरला गेल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांचा संपर्क होत नसल्याने सना खानच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून पोलीस सना खान यांचा शोध घेत आहेत.



सनाचे कुटुंबीय बघत आहेत वाट : तीन ऑगस्टपासून सना खानसोबत संपर्कच होऊ शकत नसल्याने, नागपुरात राहणारे तिचे नातेवाईक चिंतेत आहेत. त्यातच अनेक प्रकारच्या अफवा पसरत असल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सना ज्याला भेटण्यास जबलपूर येथे गेली होती ती व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असून ती देखील बेपत्ता असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

हेही वाचा -

  1. Army Soldier Missing : सुट्टीवर आलेला सैनिक बेपत्ता, सुरक्षा दलाने शोधण्यासाठी सुरू केली मोहि
  2. Army Jawan Missing : वृद्ध आई वडिलांनी केले बेपत्ता मुलासाठी उपोषण; भागवत कराड यांनी माहिती घेतली अन्...
  3. Women Missing : देशात तीन वर्षांत 13 लाखांहून अधिक महिला बेपत्ता, महाराष्ट्रातील आकडाही चिंताजनक
Last Updated : Aug 8, 2023, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.