ETV Bharat / state

नागपूर : पोलीस अधिकारी शारदा प्रसाद मिश्रा यांना पोलीस पदक जाहीर

author img

By

Published : Jan 25, 2021, 8:55 PM IST

President Police Medal Nagpur
पोलीस अधिकारी शारदा प्रसाद मिश्रा

राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली. प्रशंसनीय सेवेकरिता प्रदान करण्यात येणारे पोलीस पदक नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शारदा प्रसाद मिश्रा यांना जाहीर झाले आहे.

नागपूर - राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली. प्रशंसनीय सेवेकरिता प्रदान करण्यात येणारे पोलीस पदक नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शारदा प्रसाद मिश्रा यांना जाहीर झाले आहे.

हेही वाचा - शरीरिक संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार - नागपूर खंडपीठ

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५७ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ठ सेवेकरिता 'राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक', १३ पोलीस शौर्य पदक, तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

प्रशंसनीय सेवेकरिता प्रदान करण्यात येणारे पोलीस पदक नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शारदा प्रसाद मिश्रा यांना जाहीर झाले आहे. नागपूर पोलीस दलात पदक प्राप्त करणारे शारदाप्रसाद मिश्रा हे एकमेव पोलीस अधिकारी आहे.

यावर्षी एकूण ९४६ पोलीस पदक जाहीर

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येते. या वर्षी एकूण ९४६ पोलीस पदक जाहीर असून ८९ पोलिसांना 'राष्ट्रपती विशिष्ठ सेवापदक', २०५ पोलिसांना 'पोलीस शौर्य पदक, ६५० पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी 'पोलीस पदक' आणि २ 'राष्ट्रपती शौर्य पदक' जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५७ पदक प्राप्त झाली आहेत.

देशातील ८९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ठ सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंग, ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम व शाहू नगर मुंबईचे पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाले आहे.

शारदाप्रसाद यांची ३२ वर्षांची पोलीस सेवा

शारदाप्रसाद रमाकांत मिश्रा हे सध्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. ते नागपूर शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून १५ फेब्रुवारी १९८८ रोजी भरती झाले होते. या दरम्यान त्यांनी पोलीस मुख्यालय, कोराडी, तहसील, एमआयडीसी, सिताबर्डी, विशेष शाखा, धंतोली या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. नोकरी दरम्यान त्यांना जवळपास २९० बक्षिसे आणि २०१८ मध्ये पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह देखील प्राप्त झाले आहे.

हेही वाचा - राज्यात पोलिसांसाठी एक लाख नवी घरे बांधणार - गृहमंत्री अनिल देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.