ETV Bharat / state

नागपूर: दारू पिण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून..

author img

By

Published : Jul 2, 2020, 5:47 PM IST

murder-of-a-friend-over-a-drinking-dispute-in-nagpur
दारू पिण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून..

अमोल शिल्लार आणि आशिष जोध हे दोघेही चांगले मित्र होते. आशिष हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री आशिष व अमोल त्रिकोणी पार्क येथे दारू पित होते.

नागपूर- गेल्या महिन्यात नागपुरात तब्बल १७ खून झाल्यानंतर या महिन्याची सुरुवात सुद्धा खुनाच्या घटनेने झाली आहे. नागपूर शहरातील सक्करदारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद नगरात त्रिकोणी पार्कजवळ गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या अमोल शिल्लार नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या झाली आहे.

दारू पिण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून..

दारू पिण्याच्या वादातून आरोपी आशिष जोध याने अमोलचा खून केल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल शिल्लार आणि आशिष जोध हे दोघेही चांगले मित्र होते. आशिष हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री आशिष व अमोल त्रिकोणी पार्क येथे दारू पित होते. त्याचवेळी दोघांमध्ये दारू पिण्याच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आशिषने अमोल याच्यावर धारधार चाकूने वार केले. त्यात अमोलचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आशीर्वाद नगरात खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती समजताच सक्करदारा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत आरोपी आशिष पसार झाला होता. सक्करदारा पोलीस आरोपी आशिषचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करणार होते. त्याचवेळी आशिषने गुप्तीसह (धारधार मोठा चाकू) सक्करदरा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आशिषला अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.