ETV Bharat / state

विधानसभेत लोकायुक्त विधेयकाला मंजुरी; मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी साधला संवाद

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 10:30 PM IST

Updated : Dec 15, 2023, 10:55 PM IST

cm eknath shinde and anna hazare
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अण्णा हजारे

Legislative council passes Lokayukta Bill : राज्याच्या विधानसभेत लोकायुक्त विधेयक पारित करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना फोन करुन दिली. यावर अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

नागपूर Legislative council passes Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्याना ही बातमी दिली. यावेळी हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

अण्णा हजारे यांचं दिल्लीतील आंदोलन होतं चर्चेत : युपीए 2 सरकारच्या कार्यकाळात देशभरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे एकामागून एक समोर यायला लागल्याने त्यांना आळा घालण्यासाठी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याची मागणी पुढे आली. हे विधेयक संसदेत मांडून ते पारित करावे या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आमरण उपोषण केले. अण्णांचे आंदोलन अल्पावधीतच लोकांनी उचलून धरल्याने त्याचे जनआंदोलनात रूपांतर झाले. अखेर जनतेच्या रेट्यामुळे 2014 साली युपीए -2 सरकार कोसळले. केंद्रात लोकपाल प्रमाणेच राज्यातही लोकायुक्त विधेयक मंजूर करण्याची आग्रही मागणी त्यावेळी अण्णांनी केली होती. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करून राज्याच्या विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देखील या विधेयकाद्वारे लोकयुक्तांच्या कक्षेत आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंसोबत साधला संवाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही बातमी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फोन करून सांगितली. यावेळी त्यांनी सध्या राज्यात अनेक आंदोलने सुरू असून तुमचे आंदोलन आम्हाला परवडले नसते. त्यामुळे आम्ही लोकायुक्त विधेयक मंजूर केल्याचे सांगितले. यावर अण्णांनी समाधान व्यक्त करत, तुमच्या कारकिर्दीत हे विधेयक संमत करून घेतलेत याचा विशेष आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल असेही त्यांनी सांगितले.

तब्येतीची काळजी घ्यावी : काही जणांचा हे विधेयक मांडण्याला विरोध होता. मात्र, अण्णा जे काही सांगतील व सुचवतील ते सर्वसामान्य लोकांच्या भल्याचेच असेल याची खात्री पटल्याने या विधेयकाच्या मार्गातील सगळे अडथळे बाजूला करून ते संमत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अण्णांना सांगितले. तसेच राज्यातील महायुती सरकारला यापुढे देखील आपल्या मार्गदर्शनाची गरज असून त्यासाठी तब्येतीची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा हजारे यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून फोन करून संवाद साधल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

हेही वाचा - सलीम कुत्ताशी संबंधावरून सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी

Last Updated :Dec 15, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.