ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभेतही गॅलरीत घोषणाबाजी; अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

author img

By PTI

Published : Dec 15, 2023, 11:30 AM IST

Maharashtra Assembly Winter Session 2023
संग्रहित छायाचित्र

Maharashtra Assembly Winter Session 2023 : महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. मात्र या अधिवेशनात विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येत नसल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला. त्यामुळं त्यांनी गॅलरीत प्रचंड घोषणाबीज केली.

नागपूर Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भवादी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पत्रकार प्रकाश पोहरे यांनी शेतकरी आणि विदर्भाच्या समस्या मांडण्यासाठी गॅलरीत घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचे पडसाद विधानभवनाच्या सदनातही उमटले. तालिका अध्यक्ष असलेले आमदार चेतन तुपे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित करुन लोकसभेत 13 डिसेंबरला झालेल्या हल्ल्याचा संदर्भ दिला. त्यामुळं या प्रकरणी अध्यक्षांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहे.

गॅलरीत प्रचंड घोषणाबाजी : नागपूर हिवाळी अधिवेशन हे विदर्भातील प्रश्नांसाठी घेण्यात येते. मात्र नागपूर अधिवेशनात विदर्भाच्या आणि पूर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कोणीच बोलत नसल्याचा आरोप प्रकाश पोहरे यांनी केला. गेल्या 7 डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनात विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येत नाही. ही चर्चा फक्त मराठा आरक्षणावरच सुरू आहे. मराठा आरक्षणावरुन आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मात्र विदर्भातील शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्यांविषयी या अधिवेशनात अद्यापही चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप पोहरे यांनी केला.

शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो : विदर्भातील आमदार विदर्भातील शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येवर सदनात बोलत नाहीत. विदर्भातील शेतकरी आत्महत्या वाढल्या असूनही त्यांच्या समस्या कोणताही प्रतिनिधी मांडत नसल्याचा आरोप प्रकाश पोहरे यांनी केला. त्यामुळं मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे, असही त्यांनी यावेळी सांगितलं.

घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल : गुरुवारी सभागृहात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचा मुद्दा प्रचंड गाजला. त्यामुळं भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी लोकसभेत 13 डिसेंबरला झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ही गंभीर बाब असल्याचं स्पष्ट केलं. आशिष शेलार यांनी विधानसभा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. गॅलरीतून घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही अध्यक्ष तुपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

विधानसभेच्या सुरक्षेचा भंग : विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणी बोलत नसल्याचा आरोप प्रकाश पोहरे यांनी करत गॅलरीत घोषणाबाजी केली. मात्र आमदार आशिष शेलार यांनी विधानसभा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. लोकसभेत बुधवारी दोन तरुणांनी हल्ला केला. तसाच विधानसभेच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर असल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. विधानसभेच्या प्रेस गॅलरीत कोणीतरी हातवारे करत फिरते, सभापतीच्या दिशेनं घोषणाबाजी करते, ही व्यक्ती कोण आहे, त्यांना प्रवेश कसा मिळाला, हा विधानसभेच्या सुरक्षेचा भंग कसा करू शकला आदी प्रश्न आशिष शेलार यांनी सदनात उपस्थित केले. त्यांच्या मागणीवर कारवाई करत अध्यक्ष चेतन तुपे यांनी चौकशीचे आदेश दिले.

हेही वाचा :

  1. हिवाळी अधिवेशनात २२ हजार ९९२ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
  2. Maharashtra Monsoon Session पावसाळी अधिवेशनाचा तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा आक्रमक होणार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.