ETV Bharat / state

Water Crisis In Maharashtra: यंदा महाराष्ट्राचा घसा राहणार अधिक कोरडा - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 5:46 PM IST

Water Crisis In Maharashtra
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Water Crisis In Maharashtra: यंदा राज्यात सरासरीपेक्षा 11 टक्के पाऊस कमी पडला. (Less rain in Maharashtra) त्यामुळे राज्यातील काही भागातील जनतेला येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. (water supply minister) राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अशी माहिती दिली आहे. मात्र, राज्य सरकारनं त्यासाठी उपाय योजना सुरू केल्या असून सूक्ष्म योजनाद्वारे प्रत्येकाला पाणी मिळेल याची तजवीज केली जात आहे.

पाणी टंचाईवर पाणीपुरवठा मंत्र्यांचे मत

मुंबई Water Crisis In Maharashtra : राज्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस खूपच कमी पडला. राज्यातील धरणांमध्ये अजूनही पाणीसाठा असला तरी येत्या दोन महिन्यांमध्ये हा पाणीसाठा खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे विंधन विहिरी, नैसर्गिक स्रोत याच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. तसंच पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं लागणार आहे. मात्र राज्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरं जावं लागू नये यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (less water storage in dam)


तीनशे टँकर सुरू : सध्या राज्यात वाडी वस्तींवर पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 300 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ऑक्टोबर महिन्यातील ही स्थिती असल्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करावे लागणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं नियोजन केलं आहे. मात्र यात सोबत राज्यातील धरणातील पाणीसाठा किती आहे याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. तलावातील पाणी नदीमधील पाणी विंधन विहिरी याचाही आढावा राज्य सरकारच्या वतीने घेतला जात आहे. पाण्याचं नियोजन अधिक बळकट करणं आणि पाण्याचे स्त्रोत जपणे यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहे. ज्याद्वारे राज्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार नाही असंही पाटील म्हणाले.

'हर घर जल मिशन'द्वारे पाणीपुरवठा : केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून 'हर घर जल मिशन' राबवण्यात येत आहे. या मिशनद्वारे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला किमान 55 लिटर पाणी दरडोई मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेतच. याशिवाय लहान वाडी, वस्त्यांवरसुद्धा पाणी पोहोचलं पाहिजे यासाठी सूक्ष्म नियोजन केलं जात आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे पाणीपुरवठा योजनेद्वारे राज्यातील विविध दुर्गम भागात पाणीपुरवठा योजना राबवल्या जात आहेत. पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनं अधिक सूक्ष्मपणे नियोजन करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा पावसाचं प्रमाण कमी असलं तरीही जनतेला पाणीटंचाईला फारसं तोंड द्यावं लागणार नाही, असा दावाही पाटील यांनी यावेळी केला.

हेही वाचा:

  1. Bhagwat Karad On Water Crisis : वैजापूर गंगापूर तालुक्यातील 365 गावातील पाणी टंचाई होणार दूर - डॉ भागवत कराड
  2. Thane Water Crisis : मुख्यमंत्र्यांचा जिल्हाच तहानलेला; 8 दिवसांनी येतो पाण्याचा टँकर
  3. Water Issue Nashik: नाशिकमधील पेठ गावात पाण्याचे दुर्भिक्ष; पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.