ETV Bharat / state

Uddhav Thackeray Critics on ECI : आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला पण 'ठाकरे' हे नाव चोरता येणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

author img

By

Published : Feb 20, 2023, 2:49 PM IST

Updated : Feb 20, 2023, 6:52 PM IST

आमच्याकडून सर्व काही चोरले गेले आहे. आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेले पण 'ठाकरे' हे नाव चोरता येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्यापासून सुनावणीला सुरुवात होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

Uddhav Thackeray Critics
उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरणे हा पूर्वनियोजित कट होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पूर्वनियोजित कट: सर्वांनी एकत्र पक्ष सोडला नाही. सुरुवातीला 16 जण गेले. त्यानंतर 23 जणांनी पक्ष सोडला. त्यांच्या तक्रारी आधीच आयोगाकडे आहेत. त्यामुळे त्या क्रमाने या तक्रारींची सुनावणी व निकाल लागले पाहिजे. मात्र आता हा निकाल लागला आहे. त्यामुळे हे सगळे कटा कारस्थान करुन ठरवून केले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांचे नाव चोरण्यापेक्षा त्यांनी स्वतःचे नाव लावावे. स्वतःच्या वडिलांचे नाव लावावे. त्यानंतर निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.

हा गुन्हा ठरेल: ते पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गटासाठी खुले करणे हा गुन्हा ठरेल. कारण सध्या एकही सदस्य अस्तित्वात नाही. महापालिका बरखास्त केलेली आहे. त्यामुळे एकही कॉर्पोरेटर नाही अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी सील काठणे हे चुकीचे ठरेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाच्या व्हिपचा आदेश आपल्याला लागू होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दोन गट वेगवेगळे आहे. निवडणूक आयोगाने ते आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचा व्हिप आपल्या गटाला किंवा आपल्याला लागू होण्याचा प्रश्नच नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे पुढे म्हणाले की, ते बाहेर पडलेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची तलवार आहे. आमच्या डोक्यावर नाही, असेही ते म्हणाले.

सुप्रिम कोर्टात दिले आव्हान: उद्धव ठाकेर पुढे म्हणाले की, त्यांना मिळालेले हे चोरलेले शिवधनुष्य आहे. जे शिवधनुष्य रावणाने नाही पेलले ते मिंध्यांना कसे पेलणार, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला आहे, त्याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती न करता त्यांची निवड झाली पाहिजे, अशी देखील मागणी ठाकरे यांनी केली.

निवडणूक आयोगाचा घाईत निर्णय: सर्वांनी एकत्र पक्ष सोडला नाही. सुरुवातीला 16 जण गेले. त्यानंतर 23 जणांनी पक्ष सोडला. त्यांच्या तक्रारी आधीच आयोगाकडे आहेत. त्यामुळे त्या क्रमाने या तक्रारींची सुनावणी व निकाल लागले पाहिजेत. मात्र आता हा निकाल लागला आहे. त्यामुळे हे सगळे कट कारस्थान ठरवून केले आहे, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: Shiv Sena Whip : ठाकरे गटालाही आमचा व्हीप लागू असणार -भरत गोगावले

Last Updated :Feb 20, 2023, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.