ETV Bharat / state

Today Vegetables Rate:गृहिणींना दिलासा; एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर स्थिर..

author img

By

Published : Mar 25, 2023, 7:21 AM IST

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोप्रमाणे फळभाज्या व १०० जुडयांप्रमाणे पालेभाज्यांच्या दरात कोणत्याही प्रकारे चढ उतार झाला नसल्याने सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

नवी मुंबई:भाज्यांचे दर आज असे आहेत. आज नंबर १ भेंडी प्रति १०० किलो ४६०० रुपये ते ५२०० रुपयावर आहे, नंबर २ भेंडी प्रति १०० किलो, ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे. तसेच लिंबू प्रति १०० किलो ६७०० रुपये ते ८००० रुपये फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३३०० रुपये ते ३६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ८००० ते १०००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये आहे.तर टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, तसेच तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६५०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे.

Today Vegetables Rate In Apmc Market
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

इतर भाज्या: कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये आहे. तसेच रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये दर आहे. त्याचबरोबर शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६०० रुपये इतका, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४८०० रुपये आहे.

आजचे पालेभाज्या दर: आज नाशिकात कांदापात ही प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये किंमत आहे. पुणे येथे कांदापात प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये. नाशिकात कोथिंबीर प्रति १००जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, तर कोथिंबीर पुणे येथे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये दर आहे. मेथीची किंमत ही नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १५०० रुपये आहे मेथी पुणे येथे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये आहे., तर , पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये आहेत.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये वाढले या भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.