ETV Bharat / state

Today Vegetables Rate: मार्केटमध्ये भाज्या महागल्या; मागणी वाढल्याने लिंबुच्या दरात लक्षणीय वाढ

author img

By

Published : Mar 10, 2023, 8:31 AM IST

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्याचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे.सुरणच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. पडवळच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, लिंबूच्या दरात चक्क पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर ही वाढलेले पाहायला मिळाले.

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो, २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ७५०० रुपये ते १०,००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३५०० रुपये ते ४००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये आहेत.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या महागल्या



फळ भाज्यांचे दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, ३५०० रुपये ते ४००० रुपये आहेत.


पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये आहेत. कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये आहेत. मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ९०० रुपये आहे.



इतर भाज्यांचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये आहे. तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३४०० रुपये ते ३८०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये आहेत.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये ढोबळी मिरची वांगी व मिरचीच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.