ETV Bharat / state

गुन्हे शाखेची कारवाई; 31 ग्रॅम कोकेनसह नायजेरीयन आरोपीस अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 11:03 AM IST

thane crime nigerian accused has been arrested by Crime Branch along with 31 grams of cocaine
31 ग्रॅम कोकेनसह नायजेरीयन आरोपीस अटक

Thane Crime : ठाण्यात गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. तब्बल 12 लाख 51 हजार 360 रुपयांच्या 31 ग्रॅम कोकेनसह एका नायजेरीयन आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आरोपीला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाणे Thane Crime : ख्रिसमस (नाताळ) आणि नवीन वर्षाचा जल्लोष उंबरठ्यावर आलाय. याच पार्श्वभूमीवर विविध हॉटेल्स आणि बार्समध्ये जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जाते. तसंच या पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दरम्यान, अशाच पार्ट्यांसाठी कोकेन घेऊन आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला 31 ग्रॅम कोकेनसह गुन्हे शाखेनं अटक केलं आहे.


मुद्देमालासह आरोपीस अटक : 19 डिसेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना खबऱ्यानं आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड, बस पार्किंग जवळ कोपरी ठाणे पूर्व इथं एक नायजेरीयन व्यक्ती कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली होती. त्यावरुन सदरील ठिकाणी सापळा रचून ओकोरी इमॅन्युअल ब्राईट (वय 33 वर्षे, रा.प्रगतीनगर, नालासोपारा, ठाणे) याला ठाणे गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकानं ताब्यात घेतलं. यावेळी 31 ग्रॅम कोकेन, मोबाईल, रोख रक्कम आणि इतर वस्तू असा 12 लाख 51 हजार 368 रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. दरम्यान, गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेलं कोकेन आरोपी कोणाला विकणार होता, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुन्हा दाखल : दरम्यान, अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये आरोपी विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच बुधवारी (20 डिसेंबर) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने (गुन्हे शाखा, घटक 5, वागळे, ठाणे) हे करीत आहेत.

हेही वाचा -

  1. कासारवडवली हत्या प्रकरणात तक्रारदारच निघाला आरोपी! पोलिसांच्या तपासात 'असा' झाला उलगडा
  2. Thane Murder: २० वर्षीय चालकाची हत्या; मृतदेह लटकवला झाडाला, तर आरोपीचा शोध सुरू
  3. Husband Killed House Servant: बायको राहिली गरोदर, नवऱ्याचा मात्र नोकरावरच संशय अन् केली त्याची हत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.