ETV Bharat / state

Nitesh Rane Warning To Congress : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीनं बसवा अन्यथा... - नितेश राणे

author img

By

Published : Aug 18, 2023, 3:48 PM IST

Nitesh Rane Warning To Congress
नितेश राणे

कर्नाटक येथील बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रातोरात हटवण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी आहे. कॉंग्रेसने हा पुतळा नियोजित स्थळी लवकरात लवकर स्थापन करावा; अन्यथा काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटर अर्थात एक्सवरुन दिला आहे.

नितेश राणे यांचा कॉंग्रेसला कडक इशारा

मुंबई : कर्नाटकातील बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रातोरात हटवण्यात आला. याबाबत भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा पुतळा लवकरात लवकर बसवावा. अन्यथा काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. तर कर्नाटक सरकारची मुजोरी आम्ही सहन करणार नाही, असा इशारा ट्विटरवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनीसुद्धा दिला आहे.



लाखो, करोडो शिवभक्तांचा अपमान : याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की, जेव्हापासून कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले आहे तेव्हापासून सातत्याने हिंदू विरोधी भूमिका घेण्याचे काम चालू आहे. हिंदूंवर हल्ले केले जात आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात आहेत. लव जिहाद कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने रातोरात हटवला गेला. हा लाखो, करोडो शिवभक्तांचा अपमान आहे. याबाबत कर्नाटक काँग्रेस सोडा; पण महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांनी त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेते जे शिवरायांच्या नावाने राजकारण करतात त्यांनी या पुतळ्याला परत बसवण्यासाठी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाही तर महाराष्ट्रात त्यांना फिरू द्यायचे का नाही, याचा विचार सामान्य जनता निश्चित पद्धतीने करेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.


काँग्रेसला गंभीर परिणाम भोगावे लागतील : याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा ट्विटर (एक्स) वरून या प्रश्नावर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मुजोरी करत मध्यरात्री बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही कदापि सहन करणार नाही. महापुरुषांचा सातत्याने अपमान करणे हे काँग्रेसचे धोरण बनले आहे. कर्नाटक सरकारनं लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, अशा शब्दात इशारा देण्यात आला आहे.

  • कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही.

    महापुरुषांचा सातत्यानं अपमान…

    — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा:

  1. INDIA Meeting in Mumbai: 'इंडिया'च्या बैठकीत महाविकास आघाडीत 'अशी' असणार जबाबदारीची विभागणी
  2. Ashok Chavan On Maratha Reservation : ...तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणे अशक्य - अशोक चव्हाण
  3. Nana Patole on VBA : महाविकास आघाडीत सहभागासाठी 'वंचित'चा प्रस्ताव? नाना पटोले म्हणाले...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.