ETV Bharat / state

'महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचायं'

author img

By

Published : Jan 2, 2020, 8:34 PM IST

Shivsena leader Sanjay Raut
संजय राऊत यांनी यांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथालाही परवानगी नाकारली आहे. यावर राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. आता संजय राऊतही यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, त्यांना ट्वीटरवरुन भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे.

मुंबई - यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरुन सरकारवर निशाणा साधला. हे जर काँग्रेसच्या काळात घडले असते तर भाजपने बोंबाबोंब केली असती, आज गप्प का? असा सवालही राऊत यांनी केला.

  • महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला.अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?

    — Sanjay Raut (@rautsanjay61) January 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथालाही परवानगी नाकारली आहे. यावर राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. आता संजय राऊतही यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, त्यांना ट्वीटरवरुन भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचाय? यामागे राजकीय षडयतंत्र आहे काय?असा सवालही राऊत यांनी केला.

  • महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसु नयेत या मागे राजकिय षडयंत्र आहे काय?
    आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?

    — Sanjay Raut (@rautsanjay61) January 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ दिसू नये यामागे राजकीय षडयंत्र आहे काय? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला. आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत, हा आमचा गुन्हा आहे का? असेही राऊत यावेळी म्हणाले.

प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये राजपथावर संचालनात सर्व राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा दर्शवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राला २०१८ मध्ये चित्ररथासाठी पहिला क्रमांक मिळाला होता. महाराष्ट्राने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ साकारला होता. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आतापर्यंत ६ वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

Intro:Body:

'महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचायं' 

मुंबई - यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरुन सरकारवर निशाणा साधला. हे जर काँग्रेसच्या काळात घडले असते तर भाजपने बोंबाबोंब केली असती, आज गप्प का? असा सवालही राऊत यांनी केला.

महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथालाही परवानगी नाकारली आहे. यावर राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. आता संजय राऊतही यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, त्यांना ट्वीटरवरुन भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचाय? यामागे राजकीय षडयतंत्र आहे काय?असा सवालही राऊत यांनी केला.

प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ दिसू नये यामागे राजकिय षडयंत्र आहे काय? असा सवालही यावेळी राभत यांनी केला. आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? असेही राऊत यावेळी म्हणाले.

प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये राजपथावर संचालनात सर्व राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा दर्शवण्याचा प्रयत्न करतात.  महाराष्ट्राला २०१८ मध्ये चित्ररथासाठी पहिला क्रमांक मिळाला होता. महाराष्ट्राने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ साकारला होता. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आतापर्यंत ६ वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.